मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
उठा हो गर्जा जयजयकार

भावगंगा - उठा हो गर्जा जयजयकार

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


उठा हो गर्जा जयजयकार
बोला योगेश्वर भगवान ॥धृ॥
वेळ तोडूनि वेणू केली
क्षुद्र जडाची झाली मुरली
सुरेल संगीत गीता बनली
ऐकाया द्या कान ॥१॥
पशू जाणती भाषा त्याची
भक्ती जोडिली सख्यत्वाची
नकळत केले त्यातुन त्याने
मानव्या आव्हान ॥२॥
एक बदलती स्त्री प्रेमाने
सजले नवयौवन शौर्याने
झुंज जाहली इंद्रासंगे
जेत्याचा अपमान ॥३॥
करात त्याच्या चक्र सुदर्शन
जगास लाभे दिव्य सुदर्शन
दर्शनातले अगम्य सुदर्शन
दर्शनातले अगम्य मोहन
पांडव करि बेभान ॥४॥
ऐका ऐका शंखनाद हो
जगतामधला ऐका टाहो
संस्कृतिसाठी घेउन गीता
‍करा मुखाने गान ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 06, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP