भावगंगा - स्वाध्यायी मी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायी मी स्वाध्यायी, नाथाघरचा वासुदेव मी
ज्ञानेशांचा वारकरी, स्वाध्यायी मी स्वाध्यायी ॥धृ०॥
नकोच मजला तुमची भाकर
देव पुरवितो होउनि चाकर
श्रीखंड्याला प्रणाम करतो
अनन्य साधक स्वाध्यायी ॥१॥
भगवंतास्तव माझे जीवन
कृतज्ञतेचे मंदिर पावन
सदाच मंगल सुख-समृद्धी
वाटित फिरतो स्वाध्यायी ॥२॥
चमत्कृतीविण साधे जीवन
सद्गुण सगळे टिपतो हिंडुन
आचरुनी ते टाकुन दुर्गुण
उन्नत मानव स्वाध्यायी ॥३॥
नव्हेच त्यागी, नव्हेच भोगी
सुख-दु:खाला वळवी मार्गी
डोळस श्रद्धा उरी सावरुन
कीर्तनि रंगे, स्वाध्यायी ॥४॥
मर्यादित नियमांचे जीवन
वदते रसना अनुभव-निरूपण
खोदित फिरतो चराचरावर
नाव प्रभूचे स्वाध्यायी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP