भावगंगा - असे श्रीहरी दिसले गऽऽ
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गळ्यात तुळशीमाळ, कपाळी गंध केशरी दिसले गऽऽ
चारित धेनु, करात वेणु, वाजविताना हसले ग ऽ ऽ
हसले ग ऽ ऽ असे श्रीहरी दिसले ग ऽ ऽ ॥धृ॥
छातीवरती रुळे फुलांची माळ, मनगटी तुरे
मुकुट कळ्यांचा शिरी, सावळे रूप पाहण्या झुरे
वृक्षाखाली ऊन-सावली खेळत मजला दिसले ग ऽ ऽ ॥१॥
गोपीजनांचा मेळा गोळा झाला यमुनातीरी
गोड लयीच्या सुरात वेडी झाली ग बासरी
रित्या घड्यावर देता ठेका, हरवुन मजला बसले ग ऽ ऽ ॥२॥
होउनिया नि:संग खेळती रास गोपिका वनीं
झिम्मा फुगडी, रंग खेळता भिजले मी साजणी
असंख्य रूपे, पाहुन त्यांची माझ्यातच मी विरले ग ऽ ऽ ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP