भावगंगा - स्वाध्यायींचा मंत्र शुभंकर
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायींचा मंत्र शुभंकर
म्हणा म्हणा रे जय योगेश्वर
जय योगेश्वर - जय शिवशंकर ॥धृ॥
कधी देतसे वैभव गाठी
कधी ठेवतो कवड्या हाती
कधि चळता मन थप्पड देतो
रुद्र होउनी हा प्रलयंकर ॥१॥
वैभव देतो इच्छा करता
शक्ति देतो भक्ति करता
सद्बुद्धीचा प्रेरक दाता
शुद्ध करी हे मळले अंतर ॥२॥
योगेश्वर हा गीतेमधला
प्राणच केवळ समरामधला
अंधारीं हा मार्ग दावितो
मनात उठता भीषण संगर ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP