मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
स्वाध्याय मी करणार

भावगंगा - स्वाध्याय मी करणार

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


प्रभुचा मी होणार, सदोदित स्वाध्याय मी करणार ॥धृ॥
दृष्टी विधायक येते त्याने
घडती सुघटित भग्न जीवने
सुख-दुःखाला विसरुन जगणे
शिकवुनि उद्धरणार! सदोदित स्वाध्याय मी करणार ॥१॥
भाव पुरवितो ज्ञानामध्ये
तेज आणितो भक्तीमध्ये
गुंफण नुरवी धर्मामध्ये
रूढी बदलविणार! सदोदित स्वाध्याय मी करणार ॥२॥
दांभिक-वृत्ती दूर सारितो
मरण-भीतिला समूळ नाशितो
मंगलमय मृत्यूला करतो
अविरत प्रिय करणार! सदोदित स्वाध्याय मी करणार ॥३॥
आत्मनिरीक्षण-प्रेरक होतो
भगवंताची भेट घडवितो
जीवन सगळे सुसह्य करतो
भुक्त मुक्त करणार! सदोदित स्वाध्याय मी करणार ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP