भावगंगा - गीता जग तत्त्वांचे सार
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
(चाल-गीता ज्ञानाचे भांडार)
गीता तत्त्वें आचरुनी आम्ही भवसागर तरणार
गीता जग तत्त्वांचे सार ॥धृ॥
कर्तव्याचे ज्ञान असावे
कौशल्ये सत्कर्म करावे
कर्मफले ती श्रद्धापूर्वक ‘‘कृष्णार्पण’’ करणार ॥१॥
देह वस्त्र आहे आत्म्याचे
होता जीर्ण टाकून द्यायचे
अटळ अशा या नश्वरतेचा, शोक किती करणार ॥२॥
उच्च-नीच ना कोणी तेथे
आत्म्याचे आत्म्याशी नाते
एका एका ज्ञानकणातून, हाच ध्वनी घुमणार ॥३॥
समाजास जेव्हा ये ग्लानी
भल्या बुऱ्याचा विवेक लोपुनी
धर्म स्थापनेसाठी, प्रभू तो स्वयेचि अवतरणार ॥४॥
गीता ज्ञानाची ही महती
त्रिकाल बाधा त्यास नसे ती
युगे युगे आली गेली तरी हेच सत्य उरणार ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP