भावगंगा - पाहिला मी चक्रधारी श्रीहरी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
मिटुनि डोळे पाहिला मी चक्रधारी श्रीहरी
ठेविला माथा पदी अन् लोळलो चरणांवरी ॥धृ॥
सांडिली भीती, पळाल्या यातना कोठेतरी
अद्भुताच्या झालरींना पंख फुटले केशरी ॥१॥
जीवनाला गंध सुटला फुलली भक्ती मोगरी
मृदुलता अंगात भरली धवलता नाचे उरीं ॥२॥
बंध तुटले, नटलि तेथे मुक्ततेची मंजिरी
जीव दडला, शीव दिसला भावनांच्या मंदिरी ॥३॥
नम्रता मृत्यूत आली वंदुनी गेला दुरी
हासऱ्या योगेश्वराच्या वदनि वाजे बासरी ॥४॥
अभयता गीतेतली हो बैसली माझ्या शिरी
दश-दिशांचे प्रेम पाहुन बंद झाली वैखरी ॥५॥
राहिलो दोघेच अवघे स्तब्ध ऐक्याच्या घरीं
तोडिले भेदा युगाच्या भक्त मी, तो श्रीहरी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP