मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
बालतरू

भावगंगा - बालतरू

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


या ग, या ग, साऱ्याजणी; करू रोपाची लावणी
योगेश्वर पाहू त्यात, देऊ ममतेने पाणी ॥धृ॥
माते धरणी ग माझे ! मानू नको कधी ओझे
मांडीवर निजवून, पाजी त्याला दूथ ताजे
तुझ्या मायेचा आधार पुष्ट होऊ दे शरीर
सांभाळ ग मागे-पुढे, माझा लाडका ईश्वर ॥१॥
अरे वाऱ्या हळू ये रे ! झोके देत गाणे गा रे !
खुदुखुदु हसवाया तान्हुल्याचे ओठ न्यारे
सांग कानात गमती, पाहिलेल्या छान रीती
विश्वाचा हा राजा माझा जीवा-जीवाचा सोबती ॥२॥
सूर्यनारायणा तुला हात जोडते निर्मला
आग पाखडू नको रे ! ऊब देई चिमण्याला
पाही स्नेहल डोळ्यांनी; राजा माझा छोटा, मानी
वामन हा विष्णू होवो मना माझ्या ही लागणी ॥३॥
येरेयेरे काळ्या मेघा रुसू नको कधी उगा
राग कधी धरू नको; पाजी पाणी, सोड दंगा
फुलू दे, फुलू दे ह्याला; वाढो संसार सुखाचा
माझ्या पूजेला लाभू दे; हात तुझा प्रसादाचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP