भावगंगा - उठ मर्दा !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
घे करीं तल्वार गीता ज्ञान भक्ती अंतरी
या युगाची ही लढाई शस्त्रसंधी ना करी
कार्य हे योगेश्वराचे नाव त्याचे वैखरी
ऊठ मर्दा ! सिंहनादे पुत्र रे तू ईश्वरी ॥धृ॥
भोगवादी या युगाची आसुरी संपन्नता
राक्षसी वृत्तीस पाणी, वेदनिष्ठा लोपता
दैववादी आंधळी लाचार भक्ती बोचरी ॥१॥
विकृती भक्तीस आली पाठपूजा हो घरी
कर्मकांडी धर्म राहे संस्कृती देशान्तरी
हे तुला आव्हान भारी यौवनाचे केसरी ॥२॥
पूर्वजांनी वेदमंत्रे जीवना साकारले
भोगयंत्रे आज आता तेज सारे लोपले
दीनता लाचारता अन् क्षुद्रता ही का उरी ॥३॥
‘उद्धरेदात्मनात्मानं’ ज्ञान गीतेने दिले
पूज्य दादांनी जगाला ते प्रयोगे दाविले
दिव्यस्पर्शे चेतनेच्या अस्मिता तू सावरी ॥४॥
ही विचारांची लढाई बुद्धियोगे चालते
ईशस्पर्शे कर्मयोगे भक्तिमार्गे राहते
संस्कृतीचे कार्य दैवी शक्ती स्वाध्याया खरी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP