भावगंगा - झालो देवाचे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
आता आम्ही आमुचे नाही, झालो देवाचे
आशीर्वच द्या दादा आम्हा, विश्व करू त्याचे ॥धृ॥
सत्य काय ते कळले आहे
हृदयामाजी ठसले आहे
त्या सत्याला पूर्ण कराया, चंदन करू देहाचे ॥१॥
अवघी दुःखे जेथे सरली
मार्ग एक तो शपथ घेतली
त्या शपथेला पूर्ण कराया विसरू भान तनाचे ॥२॥
जगद्गुरू हा कृष्णच आहे
गीता आमुची माता आहे
सहस्त्रवेळा सांगू, गाऊ, महत्त्व गीतेचे ॥३॥
निंदो कुणि वा करो मस्करी
स्वाध्यायाची गोड शिदोरी
जगास वाटू तिचा गोडवा, विचार कृष्णाचे ॥४॥
कल्पतरू ते, अमृत छाया
कर्म-भक्तिचा रसाळ पाया
देती अविरत माया त्याला, काम करी जो प्रभूचे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP