भावगंगा - दोन्ही पांडुरंग माझे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
एक चंद्रभागेतीरी, एक माझ्या संग
दोन्ही पांडुरंग माझे उधळिती रंग ॥धृ॥
एक उभा विटेवरी एक जाई घरोघरी
जाग! उठ हाका मारी काढुनिया भक्तीफेरी
एक बाह्य जीवन फुलवी एक अंतरंग ॥१॥
एक आहे वाळवंटी ठेवूनिया कर कटी
एक आहे सागरकाठी घेऊनिया गीता हाती
भावगंगा गाई एक गातसे अभंग ॥२॥
एक निर्मितो ही माती एक घडवितो मूर्ती
एक वैराग्याची प्राप्ती एक देई वैभव हाती
स्वाध्यायींच्या संगे होती स्वाध्यायात दंगा ॥३॥
एक सुखाचे आगर एक प्रेमाचा सागर
एक विश्वाचा आधार एक संस्कृति साकार
भावभक्तीचे हो दोन्ही उठती तरंग ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP