भावगंगा - ‘पांडुरंग पांडुरंग’ करावे नमन
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
‘पांडुरंग पांडुरंग’ करावे नमन
वाचावी गीता गोड फुलते जीवन ॥धृ॥
आनंदी आनंद सौख्याचे आगर
गीतेचे वचन प्रेमाचा सागर ॥१॥
कृतीला आणते आगळे वळण
गीतेचे वचन मंगल पावन ॥२॥
भावाला पोसते देवाला पूजते
गीतेचे वचन जागते, नांदते ॥३॥
आणते बहर उन्मेष उदार
गीतेचे वचन संस्कृती साकार ॥४॥
भीतीला जाळते नीतीला पाळते
गीतेचे वचन शीलाला शोभते ॥५॥
काळाला जिंकून जीव सांभाळून
गीतेचे वचन दाखवी जगून ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP