मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
भज मन ! योगेश्वर भगवान

भावगंगा - भज मन ! योगेश्वर भगवान

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.



भज मन ! योगेश्वर भगवान ॥धृ॥
गोप-गोपिंवर केली प्रीती
चतुराई तव महाभारती
उद्धव सांगेह, व्यापक तो अति
योगेश्वर भगवान ॥१॥
गोकुळात हा मुरलीवाला
‍संग्रामीं धरी सुदशर्नाला
जगणे-मरणे दोन्ही लीला
‍योगेश्वर भगवान ॥२॥
दक्ष, सज्ज, उत्साह जागता
प्रेम असो वा समोर कटुता
निर्भयता तव सकल सांगता
योगेश्वर भगवान ॥३॥
गोप-प्रीतिला दिली अमरता
सख्य भक्तिचा पार्थ विजेता
सुदामासवे वदे मित्रता
योगेश्वर भगवान ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP