भावगंगा - महामंत्र
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
महामंत्र हा, महामंत्र हा, आहे मंत्र महान
स्वाध्यायाने मानव्याला नित्य दिले उत्थान ॥धृ॥
पथ दुस्तर जरि असेल दारुण
काट्यांची झालेली पखरण
सुखरुप त्यातुन जिवास नेउन
करील सौख्य प्रदान ॥१॥
अंधाराला नसती डोळे
किरण-शलाकांनी रसरसले
कसे कळावे पाउल पुढले
हा पुरवी अवधान ॥२॥
सुखरुप जीवन याच्या हाती
निर्भया गतिचा हा सांगाती
स्वास्थ्य दिशांचे पाहुन; पुढती
फिरवी अचुक सुकाण ॥३॥
ज्ञान वाटतो मुठी भरूनी
अनुभव सांगे काळ गाळुनी
अचूकतेचा म्हणति घरधनी
अभयाची हा खाण ॥४॥
उचलुन घेतो मानव्याला
ढकलुन देतो व्यभिचाराला
पशुता भेदून देवत्वाला
पोचवि हा नौजवान ॥५॥
ॠषी निर्मिले याने जगतीं
संत लेकरे याची, वदती
महानतेची हा तर कीर्ती
मानव्या वरदान ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP