भावगंगा - गौळण भोळी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गौळण भोळी हरिरस विकते, विकते हरिचे नाम
हरि घ्या, हरि घ्या, हरि घ्या म्हणते करिते हरिचे काम ॥धृ॥
भक्तिरसाची रुची आगळी
म्हणती सगळी तिला बहकली
चिन्ता परि ना तिला कशाची
गाते हरिचे नाम ॥१॥
मस्करि करिती सारे पुसती
मला दाखवी हरिची मूती
घडा उतरुनी अलगद म्हणते
‘पहा पहा घनश्याम’ ॥२॥
हातावर ती नवनित देते
सगळे हसती ‘हरि’ ती म्हणते
ध्यान तिचे ना कधी भंगते
रमते घेऊन नाम ॥३॥
वृत्ति रंगता प्रभुनामामधि
सुधबुध हरते घडे समाधि
वेड, पिसे परि जना वाटते
घडते हरिचे काम ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023

TOP