भावगंगा - ऐकूनि गीता गान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
ऐकूनि गीता गान मधुर मन विसरे जगजंजाळ
गीता ज्ञानाचे भांडार ॥धृ॥
गीता ज्ञानामृत संजीवन
पीता मन टाकी दुबळेपण
प्रभुचरणी मन अर्पुनि होतो
मनुजाचा उद्धार ॥१॥
ओळख करिते आत्म्याशी ती
खोटे शोक भवाशा जाती
देहाला तू वस्त्र मान रे
रुदन एक अविचार ॥२॥
कर्म-प्रेरणा देते सकलां
शिकवी टाका फल-मोहाला
रात्रंदिन एकच समजावी
सेवा तव निर्धार ॥३॥
गूढ सांगते भक्ति-शक्तिचे
रूप दाविते शिवस्वरूपाचे
ज्ञान भक्ती अन् कर्मरूपिणी
पावन तीर्थ उदार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP