मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
शतवार सांगतो

भावगंगा - शतवार सांगतो

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


शतवार सांगतो गूज तुजला हवाच स्वाध्याय
आनंदी जीवनाचा आरंभिचा उपाध्याय ॥धृ॥
तू यौवनी विहंगम तुज मोकळे नभांगण
स्वच्छंद विहरण्याला तेथेही हवा स्वाध्याय
तू साहसी, अभय तू, घेतोस झेप बिनधोक
नाही विवेक जवळी त्याला उपाय स्वाध्याय ॥१॥
आकांक्षी, जिंकसी तू अर्ध्या क्षणात जग हे
लढण्यास त्या ठिकाणी सांगेल युक्ती स्वाध्याय
कोणी नसेल साथी, कोणी नसेल पाठी
एकाकी त्या क्षणाला देईल साथ स्वाध्याय ॥२॥
स्वाध्याय जीवनाचा अविभाज्य भाग बनवी
चिरयौवनी असा हा जगतात एक स्वाध्याय
विश्वास घेउनी ये, मागील सर्व टाकी
स्वामी तिन्ही जगाचा तुज भेटवील स्वाध्याय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 06, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP