भावगंगा - आम्ही रामाच्या भूमीत आलो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
N/Aआम्ही रामाच्या भूमीत आलो
आम्ही भक्तीच्या गंगेत न्हालो
आम्ही भक्तीच्या गोदेत न्हालो ॥धृ॥
आम्ही आनंद-यात्री गगनाचे
आम्ही सुगंध साऱ्या सुमनांचे
आम्ही सागर रसांचे, रंगांचे
आम्ही चांदणे पिऊन आलो ॥१॥
आमच्या डोक्यात विचार देवाचे
आमच्या चित्तात कल्लोळ प्रेमाचे
आमच्या मुखात अमृत नामाचे
आम्ही वाल्याचे वाल्मीक झालो ॥२॥
आमच्या डोळ्यांत मस्ती मुक्तीची
काना-मनात मोहिनी मुरलीची
सुधा ओठांत कृष्णाच्या नामाची
वेड्या मीरेचे पैंजण झालो ॥३॥
आली लहर लहरत वाऱ्याची
आम्हा लागली नजर रामाची
बाधा जाहली गोदेच्या पाण्याची
आम्ही मृत्यूला जिंकून आलो ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2023
TOP