भावगंगा - सागरतीरावरील वारा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
सागरतीरावरील वारा वार्ता सांगत फिरतो
गोव्यापासून ओखा सारा त्रिकालसंध्या करतो ॥धृ॥
सकाळ होता प्रभू देतसे पूर्व स्मृतींचे भान
भोजन घेता शक्ती देतसे रात्री शांतीदान
भक्त होऊनि भगवंताला त्रिवार वंदन करतो ॥१॥
हलते डुलते मंदिर येथील वरी फडकते ध्वजा
जातपात ना भक्त बोलती ‘‘फक्त प्रभो मी तुझा’’
समाज सगळा भगवंताचा इथे पुजारी ठरतो ॥२॥
जाळं, वल्ही ही उपकरणे पूजेची साधनं
हात हजारो खेचून घेती चमचमणारे धनं
श्रमभक्तीतून जीवनात या सुगंध दरवळतो ॥३॥
योजनगंधा नाव चालते गात ‘मधुराष्टकम्’
मीन तळाचा वरी येतसे ऐकून ‘कृष्णाष्टकम्’
भक्तीफेरी करून मासा मृत्यूलोकहि तरतो ॥४॥
गीता अमुची आई आमुचे ‘‘दादा’’ वडील भाई
कृपा तयांची आम्हा मिळाली ही अमुची पुण्याई
प्रयोगभक्ती करून थकता हात प्रभूचा फिरतो ॥५॥
N/A
Last Updated : September 24, 2023
TOP