भावगंगा - तू अबला तू ललना न तू सैरंध्री
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तू अबला तू ललना न तू सैरंध्री
तू दुर्गा, तू चंडी, ऊठ पुरंध्री ॥धृ॥
महिला तू, माता तू, आदिम शक्ती
शौर्याची गाथा तू ईश्वर-मूर्ती
त्याग पदे रूपवती आणि सुंदरी
तू दुर्गा, तू चंडी, ऊठ पुरंध्री ॥१॥
प्रेमाची स्वामिनी तू दास्य नव्हे ते
सेवेचे प्रगट रूप उघड विहरते
मानबिंदु तोच तुझा सावर दोरी
तू दुर्गा, तू चंडी, ऊठ पुरंध्री ॥२॥
विश्वातिल शांती तुझ्यातून प्रगटते
क्रांतीला भाष्य तुझे नित्य पोसते
धरिसि मनि करशिल ते भरसि माधुरी
तू दुर्गा, तू चंडी, ऊठ पुरंध्री ॥३॥
रामाची सीता तू गौळण हरिची
झांशीची राणी तू वीज गगनिची
तारक तू, रक्षक तू, ऊठ झडकरी
तू दुर्गा, तू चंडी, ऊठ पुरंध्री ॥४॥
करशिल जरि नेम मनीं गाईन गीता
विश्वातुनि हद्दपार होईल भिरुता
निर्मिशील जग एकच हरिमय-नगरी
तू दुर्गा, तू चंडी, ऊठ पुरंध्री ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP