मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
अंधारी रात गेली

भावगंगा - अंधारी रात गेली

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


अंधारी रात गेली, आली प्रभात
आज नवयुग निर्माता माणूस आला
अस्मिता जागवून जीवन समजावणारा वैदिक विचारांचा वारस आला ॥धृ॥
माणसाला माणसाचे नाते समजावतो
स्वार्थाची साथ सोडी प्रेमे कवटाळतो
गीता संदेश गावोगावी पोचवतो
भक्तीच्या शक्तीने सृष्टी सजवतो
हृदयात राग वसे, सदा त्याची साथ असे, ओळख देणारा माणूस आला
ॠषींच्या मार्गाने घडवी इतिहास, नवी वाट निर्माता माणूस आला ॥१॥
भावमय जीवनात संगीत भरणारा
अस्मिता राखून जीवन जगणारा
प्रभूच्या कार्यास हृदयीं धरणारा
कृतज्ञी जीवनात सौरभ भरणारा
धरी दादांचा हात त्याला योगेश्वर साथ आज विश्वात फिरणारा माणूस आला
मनुष्य गौरव विश्वात वाढवीन निर्धार करणारा माणूस आला ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 07, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP