भावगंगा - आहे प्रभू उभा पाठिमागे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
काम करीत जा, हाक मारीत जा
मदत येईल धावून वेगे, आहे प्रभू उभा पाठिमागे ॥धृ॥
निष्ठा प्रभूवर अढळ राख तू
उगाच ध्येयात नकोत किंतू
सावर श्रद्धा अविचल हेतू
जाई गुंफीत प्रेमाचे धागे, आहे प्रभू उभा पाठिमागे ॥१॥
घराघरावर नाव प्रभूचे
मुखामुखामधी शब्द गीतेचे
चराचरावर राज्य श्रुतीचे
सांग जीवन तू अनुरागे, आहे प्रभू उभा पाठिमागे ॥२॥
भीती मनातिल काढील गीता
प्रीती सांगते वैदेही सीता
त्यागात वैभव जाते अहंता
तोच मार्ग सोपा दिव्य लागे, आहे प्रभू उभा पाठिमागे ॥३॥
संघ, पंथांचे नकोत वाडे
विशाल विश्वाची उघड कवाडें
साफल्य त्याविण कधी न जोडे
लाव शक्ती व्हावे विश्व जागे, आहे प्रभू उभा पाठिमागे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP