मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
उरली तीव्र कामना

भावगंगा - उरली तीव्र कामना

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


तुझे अस्तित्व मज भासावे
उरली तीव्र कामना रे ॥धृ॥
तुझा महिमा अपार, गीतात गालो
तुझे रिखून गुण मी प्रेम न्हालो
माझ्या सुरात सूर मिळू दे
उरली तीव्र कामना रे ॥१॥
तुझ्या मूर्तीची शिल्पें अनंत पाहिली
मान झुकवून पापोही काही धुतली
बने मूर्ती साकार रूप तुझे
उरली तीव्र कामना रे ॥२॥
‍तुझी शिल्पें जगातिल अनेक पहिली
त्यांच्या रंगांनी मोहिनी मला घातली
तुझ्या चित्रात तुजला पहावे
उरली तीव्र कामना रे ॥३॥
तुझी सुंदरता सृष्टीत सारी भरली
माझ्या गीतांच्या मालेत ती गुंफिली
भर गीतात जीवनरस तुझा
उरली तीव्र कामना रे ॥४॥
तीर्थस्थाने फिरून मी खूप आलो
पान पान चुंबून प्रकाश ल्यालो
माझे पौरुष प्रसाद बने तुझा
उरली तीव्र कामना रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP