मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५७१ ते ५७५

पदसंग्रह - पदे ५७१ ते ५७५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५७१. [चा. सदर.]
नरदेहा येउनी काय रे हित केलें ॥ध्रु०॥
अगणित पुण्यें तनु मानसी ॥ प्राप्त झाली असतां कैसी ॥
ते त्वांसमर्पिली विषयांसीं ॥ जैसी दासी आंदणी ॥१॥
आहार निद्रा भय मैथुन ॥ जीवमात्रासी हें ध्यान ॥
येथें पूर्ण ब्रह्मज्ञान ॥ मानवदेहींची व्हावें ॥२॥
पुत्र कलत्र गोत्र मित्न ॥ सर्वै सपत्ति चित्रविचित्र ॥
नाशिवंत इहामूत्न ॥ केवळ पात्र दुखाचें ॥६॥
साधसंपन्न त्वां व्हावें ॥ नवविध भजनें अनन्य भावें ॥
हरिगुरुचरणा शरण रिघावें ॥ तरणोपायाकारणें ॥४॥
सांडुनि देहबुद्धिचा संग ॥ पूर्ण निजानदें रंग ॥
तरीच होसील अभंग ॥ ब्रह्मरूप सर्वदां ॥५॥

पद ५७२. [चा. सदर.]
अनन्यभावें कां न भजती प्राणी मजला ॥ध्रु०॥
विद्या वयसा कीं धन कांता ॥ पुत्रापत्यें माता पिता ॥
कोण आहे संरक्षिता ॥ या भवदु:खापासूनी ॥१॥
पंचभुतात्मक हें स्थूळ ॥ केवळ सर्व चोरांचा गूळ ॥
क्षणभंगुर हा दु:खमूळ ॥ मृगजळवत्‌ जड विकारी ॥२॥
कवण्या गुणें मंदमती ॥ विषवत्‌ विषयांतें सेविती ॥
आयुष्य जातें हातोहातीं ॥ तोंडी माती घालुनी ॥३॥
साधनयुक्त अंत:करणें ॥ विहित सत्कर्में आचरणें ॥
नवविध भजनीं आत्मस्मरणें ॥ जन्ममरणें नासती ॥४॥
श्रीसद्रुरुच्या पदारविंदीं ॥ राहुनि सच्चित्सुखमकरंदीं ॥
पूर्ण रंगें निजानंदीं ॥ विदेहत्वें विचरावें ॥५॥

पद ५७३. [काशीराजकृत, चाल-सदर.]
दीनबंधू भक्तांचा साहाकारी ॥ध्रु०॥
परात्पर तरवर परीपूर्ण ॥ जंगनगकार्या चित्सवर्ण ॥
ऐसा निर्गुण परि मी सगुण ॥ झालों भक्तांकारणें ॥१॥
एका अंबरीषाकारणें ॥ दशविध रूपें म्यां अवतरणें ॥
माझ्या निजभक्तांचें उणें ॥ पडों नेदी मी कांहीं ॥२॥
कष्टी प्रर्‍हादासी द्दष्टीं ॥ देखुनि अवतरलों मी काष्ठीं ॥
करुनि परमामृतवृष्टी ॥ सृष्टी भरली स्वानंदें ॥३॥
पशू गजेंद्रा जळचरें ॥ संकट करितां पूर्ववैरें ॥
तो म्यां सत्वर कमळावरें ॥ धांवुनि येउनि सोडविला ॥४॥
करूनि दुर्योधनें गर्व ॥ द्रौपदि गांजितां अपूर्व ॥
पर्वत झालों तेव्हां सर्व ॥ सुरंग रंग वस्त्रांचे ॥५॥
ऐशा भक्तांतें उद्धरिलें ॥ त्याचें परिमित कवणें धरिलें ॥
त्यांनीं दुर्जय मन मोहरिलें ॥ संकट हरिलें म्यां त्यांचें ॥६॥
सहजीं सहज पूर्ण रंग ॥ श्रीरंगानुजात्मज अभंग ॥
असोनि निजभक्तांचा संग ॥ मजहुनि मजला आवडतो ॥७॥

पद ५७४. [चा. सदर.]
राजा महाराज तो राजयोगी ॥ध्रु०॥
नित्य पूर्ण पदावरी ॥ तन्मय छत्र शोभे शिरीं ॥
दैवी संपत्ति सेना समरीं ॥ भेद शत्रु निर्दळिला ॥१॥
बोध अनुभव हस्ति मस्त ॥ सेना शोभविती समस्त ॥
विवेक मंत्री तो नेमस्त ॥ सारासार विभागी ॥२॥
वीतराग तो सेनापती ॥ भाव सेना-सर निश्विती ॥
अक्रोधता निर्मळ शांती ॥ दुंदुभी गर्जे महाद्वारीं ॥३॥
चारी साहा अठरा भाट ॥ ब्रींद गर्जती अचाट ॥
नवविध नाचणीचे थाट ॥ निजसुखछंदें नाचती ॥४॥
निजभांडारीं सुवर्ण ॥ भरलें चिद्रत्नें परिपूर्ण ॥
अनादि अव्यय नाणें जीर्ण ॥ मूर्तीमंत अक्षयी ॥५॥
ज्याचें ठेवणें अमूप ॥ समसाम्यें स्वस्वरूप ॥
जेथें पाजळला दीप ॥ अलक्ष लक्षें सर्वदां ॥६॥
विदेहत्वें सुखासनीं ॥ विद्वद्वर्य तो चिद्भुवनीं ॥
विचरें निश्वळ अधिष्ठानीं ॥ सहज पूर्ण निजरंगें ॥७॥

पद ५७५. [चा. सदर.]
माझा सखा सोयरा श्रीहरी ॥ध्रु०॥
त्यावेगळा नाहीं थार ॥ निराधारिया आधार ॥
पावविला पैलपार ॥ भवसिंधूचा तेणें ॥१॥
त्याच्या नामें काळ बळी ॥ आम्हिं घातला पायातळीं ॥
नादों निर्भय जळीं स्थळीं ॥ काष्ठी पाषाणीं आतां ॥२॥
म्हणे करीन सांगाल तें ॥ देईन जें जें मागाल तें ॥
परंतु तुम्हीं त्यागाल तें ॥ नाशिवंत म्हणवूनी ॥३॥
काय उणें केलें तेणें ॥ दिधलें अक्षयी निय नाणें ॥
पारुषलें येणें जाणें ॥ लक्ष चौर्‍यावशी योनी ॥४॥
गणिका वाल्मिक महादोषी ॥ ज्याच्या नामें झाले ऋषी ॥
ऐसा सोयरा मी त्यांसी ॥ कैसा विसंबों आतां ॥५॥
ज्याची चरणसेवा रमा ॥ करी भाग्याची हे सीमा ॥
नेणें ब्रह्मा महिमा उपमा ॥ दुजी नाहीं द्यावया ॥६॥
आम्हां ऐसा सुखी कोणी ॥ नाहीं न दिसे त्निभुवनीं ॥
ज्याच्या धर्में हे दिनरजनी ॥ काळ वेळ नाठवे ॥७॥
जिवलग सोयरा निजाचा ॥ अनन्य शरणागत मी त्याचा ॥
झालों काया मनें वाचा ॥ निजानंदें रंगोनी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP