मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २९१ ते २९५

पदसंग्रह - पदे २९१ ते २९५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २९१. (चा. रा. स.)
संद्नुरुकृपें कल्याण ऐसें झालें ॥ द्वैताद्वैत निरसूनि ह्मण ते नेले ॥धृ०॥
अनुभवपंथें निरखितां देहभाव ॥ देह नाहीं विदेह ह्मणणें वाव ॥
लटिकें नसतां साचपणा कैंचा ठाव ॥ गेले गेले समूळ भावाभाव ॥१॥
गेला भाव अभाव कैंचा आतां ॥ देव म्हणणें हा ठाव नाहीं भक्तां ॥
समरस कां तो हेतु नाहीं हेता ॥ शून्यीं भरला नि:शून्य रामदाता ॥२॥
ऐशी खूण दावीतो सद्नुरुराव ॥ नुरेचि जेथें तात्काळ सोहंभाव ॥
सुखदु:खाचें तें गेलें भेदक नांव ॥ रंगेवीण रंगला एकमेव ॥३॥

पद २९२. (चा रा. स.)
खेळे गोकुळीं मोकळी शोभे राधा ॥ न दिसे वेगळी कायसी विषयबाधा ॥धृ०॥
कृष्णीं राधिका रातली भक्ति गोपी ॥ सौख्यें मातली ते देहभावा लोपी ॥
भेद भावना ओपिली चित्स्वरूपीं ॥ निगमा नाकळेसि झाली सर्व व्यापी ॥१॥
दळितां कांडितां न स्मरे रूप नांव ॥ सरलें मीं माझें संकल्प झाला वाव ॥
पांवा वाजवी तों पांवा दावी भाव ॥ सहजें हाले डोले हेतु नाहीं ठाव ॥२॥
लागे ताप तो विक्षेप न लावी अंगीं ॥ सत्ता बाणली नैराश्य भोगीं त्यागीं ॥
देहीं विदेह्ता नि:संग सर्व संगीं ॥ निजानंदें रंगली कृष्ण रंगीं ॥३॥

पद २९३. (चा. रा. स.)
भोळी बापुडि मी काय ऐसें जाणें ॥ यासि ओळखें ऐसें वो कैंचे शहाणे ॥
बाईमज घेतलें हो येणें जिवें प्राणें ॥ सेखीं लोकीं कीं खुंटलें येणं जाणें ॥धृ०॥
मी भाळली ये गोड याच्या बोला ॥ येणें सर्वरवेंशीं घात माझा केला ॥
सर्व प्रपंच हा शून्य होउनि ठेला ॥ मी वो तुटली या संसाराच्या मोला ॥१॥
गेलें मी माझें समूळ करूं काय ॥ तुटले सासुरें माहेर पाहा माय ॥
येणें मोडिलें विचाराचे पाय ॥ नाद जेंगटाचा जेंगटीं समाय ॥२॥
यांच्या शब्दा नाहीं एक तोही बंद ॥ येणें मोडिला संसाराचा कंद ॥
दिननिशीं लागला याचा छंद ॥ रंगीं रंगला स्वामी निजानंद ॥३॥

पद २९४. (चा. रा. स.)
नाहीं नाहीं सद्विवेक भक्ति विरक्ति ॥ लोभ मोहें अत्यंत विषयासक्ती ॥धृ०॥
निगमागमिचा सारांश नेणे सहसा ॥ साधु वदती भावार्थ न धरीं तैसा ॥
गुरुच्या बोधें सागरीं मेघ जैसा ॥ रजामसंगें मातलों साद्दश ह्मैसा रे ॥१॥
आशा देहीं रसना रस विषयीं लोळे ॥ मन घन मानीं रत कामविलासीं खेळें ॥
नाना युक्ति चालविले लोक भोळे ॥ केली रजनि दिवसाचि झांकुनी डोळे ॥२॥
शिकविं इतरांतें नाहीं माझे अंगीं ॥ शासन न मनीं विधी लंघुनि प्रमत्त भोगीं ॥
पतितोद्धारी तूं पावें मजला वेगीं ॥ निज सखया रे प्रकटें तूं अंतरंगीं ॥३॥
ब्रीदें आपुलीं सांभाळी अनाथबंधु ॥ मी अन्यायी रे तूं तव निजानंद करुणा सिंधु ॥४॥

पद २९५. (चा. रा. स.)
असत्यादि वशें कां सखिये पडिला घाला ॥ मीपण वैरी कोठुनियां आजि निघाला ॥धृ०॥
शेजे असतां कामीपण झालें जागें ॥ तें मीं माझें म्हनउनियां सैरा वागे ॥
अरि षडवर्गें आक्रमिलीं शरीरदुर्गें ॥ कोण निवारी कवण वो कवण्या खर्गें ॥१॥
माझें ह्मणतां झगटली चिंता व्याळी ॥ त्या विषलहरें सर्वांगें जाळी काळी ॥
तृष्णा झेंडु दाटला कंठनाळीं ॥ उतरुनि विष हें कवण वो मजला पाळी ॥२॥
जीववा प्राणा तो प्रताप दिनकर आणा ॥ निर्विषकर्ता रिपुसंहर्ता गुरुराणा ॥
दु:सह-चिंता अहंममता छेदक जाणा ॥ त्या निजरंगें रंगतां संकट कोणा ॥३॥
विजयी विजयी निर्द्वंद्व निजानंदें ॥ घाव निशाणिं घातला निज सुखछंदें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP