मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[द्रुतविलंबित. गण सदर.]

जरि बुडे जगतितळ हें स्वयें ॥ परि कदां न ढळे निज निश्चयें ॥
मृगजळीं बुडणें न घडे कदां ॥ म्हणवुनि मुनि निश्वळ सर्वदां ॥१॥
मुकुट कुंडल पूपुर कंकणें ॥ न घडतां घडतो बहुता गुणें ॥
सम तुके कनके तुकिजे सदां ॥ म्हणवुनि० ॥२॥
लहरि वोघ तरंग दिठीं दिसे ॥ सलिल तें लयपणें दुसरें नसे ॥
रमत सौख्यप्रुपेंविण आपदा ॥ ह्मणवुनि० ॥३॥
पट दिसे विविधाकृति कूसरि ॥ अखिल तंतु जया निज अंतरीं ॥
तदनुसार दुजें न घडे कदां ॥ ह्मणवुनि० ॥४॥
गमतसे विषयीं द्दढ रंगला ॥ श्रम नसे सहसा भ्रमभंगला ॥
परन डोळस वश्य नसे कदां ॥ म्हणवु० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP