पदसंग्रह - पदे ३४६ ते ३५०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ३४६. (लक्षमन बाला क्यों नहि या चालीवर)
कैसा स्वयंपाक केला सांग मनुबाई ॥ सावधान होउनि चित्त ठेवुनियां ठायीं ॥धृ०॥
व्कचित् पव्क अर्ध पव्क एक जैसे तैसें ॥ करपलें एक लवण हीन जळो जिणे ऐसें ॥१॥
एक खारट एक तुरट एक कडू आंबट भारी ॥ समजोन ये घरिंचे घरिं चेरा होतो पारी ॥२॥
अपणा न ये सांगसि लोकां हे तो दुष्ट खोडी ॥ चांग भांग डोलसि शेजा करिती डोई बोडी ॥३॥
मागें झाल्या होती पुढें सांप्रतही थोडया ॥ चतुर बाया मिरवताति फजित होति वेडया ॥४॥
पांच दिवस ज्याचे बाई धन्य म्हणवुनि ध्यावें ॥ रंगल्या ज्या निजानंदें त्यांसि वर्म ठावें ॥५॥
पद ३४७. (कलयुगीं घरोघरीं संत झाले फार या चा.)
पडों त्याच्या पायां जो न विसंबे ठाया ॥ राहतां दुश्वितपणें सौरस्य गेलें वायां ॥धृ०॥
जेवणार तेहि भले पूर्ण तृप्त होती ॥ कल्पनेचा स्पर्श होतां सदां मुखिं माती ॥१॥
चतुर्विध अन्न त्याचा अनुक्रम जाणें ॥ अधिकारें ग्रास घेती तृप्ति त्यांचि बाणे ॥२॥
प्राणांचा प्राण स्मरण धर्म जीविं वाहे ॥ रामकृष्ण निरुक्तिचा अर्थ होउनि राहे ॥३॥
पूर्वापर नित्य तृप्त कळा त्याचि पाहें ॥ जीवनाच्या तोषें उद्नार देत आहे ॥४॥
ब्रह्मबोधें सहज छंदें पूर्ण सुखी झाला ॥ निजानंद रंग संगें संसारा आंचवला ॥५॥
पद ३४८. (जोगिण)
ऐसी मी जोगिणी जाहलें ॥ प्रीति अलक्ष राउळा रातलें ॥१॥
अलक्ष म्हणुनि उभा राहिला ॥ जीव देखोनि तयासि भूलला ॥२॥
चहूं पालवीं झालें मोकळी । तेचि हातीं पें निरंतर झोळी ॥३॥
श्रवणिं श्रवणमुद्रा घातली ॥ तेणं अत्यंत शोभा मज आली ॥४॥
त्रिगुणांचा गोंवर घातला ज्ञान आग्नि लाउनियां जाळीला ॥५॥
शांति विभूति अंगीं चर्चिली ॥ शुद्ध सत्व शूभ्रता पातली ॥६॥
अनुहात शिंगी वाजवी । आवघा तूं तूं म्हणवुनि सादवी ॥७॥
रामरस सेवुनि जाहलें उन्मत्त ॥ सहज पूर्ण निजानंदें डुल्लत ॥८॥
आवडिं याचे पायिं रंगलें ॥ स्वयें निजानंद होउनि ठेलें ॥९॥
पद ३४९. (अभाग्याच्या० या चा.)
रंगीं रंगावें वेधकें दशरथ कुळदीपके ॥धृ०॥
रंगीं रंगा न येशी रामा फुटली ह्रदय डांक ॥ नरदेहाची घडी तुजविण वायां जाते देख ॥
अनुसंधान सुमनमाळा कोमेली नि:शेख ॥ सत्वाचा घट भरिला वेगीं येउनि देईं सूख ॥१॥
रंगा न येसिं तरि हें रंग नाम कां ठोविलें ॥ नुपेक्षावें ब्रीद आतां सुख देईं आपुलें ॥
भक्तवत्सल ब्रीद रामा बाई काय झालें ॥ दुर्घट भूतवासना इनें मन माझें घेरिलें ॥२॥
ज्ञानदीप पाजळदा स्नेहा संरलें रामाबाई ॥ हर्षाच्या गोंधळिं येउनि भक्तां सुख देईं ॥
निजानंदं पूर्ण माझें प्रगटावें ह्रदयीं ॥ रंगलें मन रंगें रंगमूर्ति ठायीं ॥३॥
पद ३५०. (डफगाणें. चा. बोलणें फोल झालें.)
तो राम झुलतो झुलतो झुलतो मज देखुनि आनंद होतो ॥ माझा स्वामि तो स्वामि तो तो मज भवसागरिं तारितो ॥
माझा जनक तो जननी तो मनाचें मोहन तो ॥धृ०॥
आजि दिवस सोनियाचा समुदाय मिळाला संतांचा ॥ गाति प्रताप रघुरायाचा नानापरी ॥१॥
राम दशरथनंदन सूर्यवंशाचें भूषण ॥ झालें पतित जन पावन हो ज्याच्या नामें ॥२॥
अहं-रावण मारिला काम कुंभकर्ण वधिला ॥ भाव विभीषण स्थापिला चिरंजीव जेणें ॥३॥
नामें गणिका तारिली चरणीं शिळा उद्धरिली ॥ वानरें वनचरें तारिलीं रामचद्रं ॥४॥
राम राज्याचि नवलपरी सारी खेळतां म्हणती मारी ॥ बंधन पुष्पा दंड छत्निचा निर्धारी ॥५॥
तो राम निजानंदघन माझ्या जिवाचें जविन ॥ रंगातीत परिपूर्ण राम निजमूर्ति ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP