पदसंग्रह - पंचक
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[सज्जनपर, शार्दूलविक्रीडित छंद.]
वाचा सत्य दया मनीं तरि तया ज्ञानी म्हणों कां नये ॥ भगवद्भक्त विरक्त आत्मविषयीं सद्वद्धिचा निश्वयें ॥
दैवी संपत्तिनें सुशोभित सदां संतोष हा अंतरीं ॥ स्वप्नामाजिं मुखावलोकन तरी त्याचें घडो श्रीहरी ॥१॥
निष्कामें निरहंकृती विहित तें सत्कर्म सत्यादरें ॥ सांगोपांग करी परंतु न ह्मणे मी एक कर्ता खरें ॥
पूर्णानंदपदीं सदेंव विलसे कामादिकां संहरी ॥ स्वप्नामाजिं० ॥२॥
सत्कर्माचरणीं समस्त करणें ज्याची सदां वर्तती ॥ हर्ष मर्ष अपूर्ण पूर्ण घडतां नोहे कदां निश्विती ॥
गोविंदाच्युत हीं समस्र लिहिलीं नामेंचे जिव्हेवरी ॥ स्वप्नी० ॥३॥
दाता धीर उदार शांत स्वरूपीं मानापमानीं कदां ॥ नोहे चचळ चित्तवृत्ति स्वसुखीं भोगी महत्संपदा ॥
चित्तंतू घन ओतप्रोत भरला जो या स्वरूपांबरी ॥ स्व० ॥४॥
ऐसा सज्जन लक्षणोक्त पहातां हे हाष्टे द्दश्याकडे ॥ देखेना सहसा निजात्मस्त्ररूपीं स्वानंदबोधें जडे ॥
ब्रह्मस्तंभ पिपीलिका स्थिरचरें जो पूर्ण रंगें भरी ॥ स्वप्नामाजिं० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP