मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३८१ ते ३८५

पदसंग्रह - पदे ३८१ ते ३८५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३८१.
सये हरी लाघवि वो ॥धृ०॥
वाउनि मोहरी मानस मोहरी वो ॥ झाली नेणवे कैसि परि वो ॥१॥
पालवुनि मज सांगे निजगुज वो ॥ गेली समूळ लोकलाज वो ॥२॥
निरखितां दिठी वो पडियली मिठी वो ॥ यातिकुळा झाली तुटी वो ॥३॥
वेधीयलें येणें बोलावुनी साजणें वो ॥ आतां राहिलें येणें जाणें वो ॥४॥
सये याचा संग वो करीतो नि:संग वो ॥ शोभे निजानंद रंग वो ॥५॥

पद ३८२. [हिंदुस्थानी]
हुं तो वारि वारि जाऊं रे ॥ तुमबिन नहीं दुजी छाउ रे ॥धृ०॥
विषय न भावुं रे गुण तेरें गाऊं रे ॥ नयनमो सुरत सुव्हाउ रे ॥१॥
सोहि तेरें काज रे भुलि कुल लाज रे ॥ बावरी भई महाराज रे ॥२॥
तेरि रंग भूलि रे वोही खुसी हालि रे ॥ निजानंदमो मतवाली रे ॥३॥

पद ३८३. [चा० बोलणें फोल झालें.]
त्यासि भावा गे ॥ सांवळा सुंदर वाहे पांवा गे ॥धृ०॥
नाम दोषाचें खंडन ॥ रूप त्रैलोक्यमंडन ॥
कळी काळाचें दंडन ॥ ऐसें बोलती श्रुती ॥१॥
जें योगीयांचें निज ॥ जें कां नीजाचें निजगुज ॥
वेदगर्भीचें सहज ॥ सुख व्यापक सये ॥२॥
जें कां मनासी नाकळे ॥ मना अंर्तबाह्म खेळे ॥
जेथें मनचि मावळे ॥ जन्म शून्य निश्चयें ॥३॥
भोग भोगुनियां भारी ॥ ज्यासि ह्मणती ब्रह्मचारी ॥
जेथें नाहीं नर नारी ॥ जन्म शून्य निश्चयें ॥४॥
सर्वीं वसे सर्वांतीत ॥ नव्हे मूर्त ना अमूर्त ॥
निजानंद सदोदित ॥ सर्व रंगीं रंगला ॥५॥

पद ३८४.
दु:ख शोकही सरला समूळ श्रमही रहला ॥धृ०॥
श्रीराम ह्रदयीं भरला तरि भवजलनिधी अंतरला ॥ करीं धनुष्य बाण साजे सुंदर ठाण ब्रह्मादिकां विंदाण न कळे कदां ॥
मानववेषधारी भक्तकाजकैवारी इंद्र चंद्र त्रिपुरारी चिंतिती सदां ॥१॥
सत्य संकल्प ज्याचा न बोले असत्य वाचा ॥ नामें जडजीवांचा मोह भंगला ॥
योगियांचें जें कं ध्येय निजभक्तांचें ह्रदय पूर्णानंदें जो अद्वय ॥ निजानंद रंगला ॥२॥

पद ३७५.
मुरली मनोहर खेळे ज्यासि पाहतां निवती डोळे ॥धृ०॥
वांकीं तोडर वाजे देहुडें ठाण साजे गोपवेषें विराजे नाटकी सये ॥
रूपची अरूप कैसें नव्हे म्हणिजे तैसें चित्त चिंतीतां पिसें होवुनि ठाय ॥१॥
नादें भूलल्या गायी नाचताति ठायीं ठायीं आनंदें घनघाई अतर्क्य कला ॥
नाठवेचि हेतू मात द्दश्य नाहीं द्दश्यातित पूर्णब्रह्म सदोदित अकळ लीला ॥२॥
सांडुनि सकळ काज पतिपुत्रांचि लाज नाठवेचि गोपी निजदेह विसरे ॥
निजानंद-सुखीं माय वृत्ति ही रंगुनि जाय बोलणें बोलिजे काय हेतुही नुरे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP