मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २८६ ते २९०

पदसंग्रह - पदे २८६ ते २९०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २८६. (चाल सदर.)
श्रीराम अवघा तूंचि तूं मीं नाहीं ॥धृ०॥
सांडुनियां ममता ॥ तव दास्यीं रमतां ॥ कैंचि मज विषमता रे ॥१॥
लहरीं तरंग उदधी ॥ तैसी हे जीवोपाधी ॥ सहजें मी अद्वय निरवधी ॥२॥
आत्मत्वें पाहतां देवा ॥ श्रुति वदति एकमेवा ॥ निजरूपीं रंग कैंचा दावा ॥३॥

पद २८७.
जिविंच्या जीवना माझिया गुरुराजया ॥धृ०॥
नवविधा भजनें देव ॥ तोषला दावी ठाव ॥
निजमोक्षा हाचि उपाव ॥ गुरुचरणीं भाव ॥१॥
श्रुति हा निर्वाह वदति ॥ ज्ञानेंचि कैवल्यप्राप्ति ॥
गुरुकृपें ज्ञानप्रतिति ॥ सिद्ध विश्रांति ॥२॥
शुक सनकादिकहि गाति ॥ जनकादिक ब्रह्मादिक ध्याति ॥
स्तविति रंगोनि तव कीर्ति ॥ जय जय निजमूर्ति ॥३॥

पद २८८. (कामाचे मजूर)
तो योगिराज सहजें मीपण मावळलें नो बोलवे बोले ॥धृ०॥
कृष्णरूपीं जडली प्रीती ॥ कृष्णमय जाहली वृत्ती ॥ पलटली पूर्वस्थिति रे ॥१॥
सहज स्वभावें बोले ॥ सहज स्थितिनें चाले ॥ सहज स्थितिनें हाले डोले रे ॥२॥
अहैतुकें खेळे खेळा ॥ रंगली अतर्क्य लीळा ॥ निजसुखें भोगी सोहाळा ॥३॥

पद २८९. (चा. सदर)
तूं पाहें रें हाचि उपाय थोर आहे ॥धृ०॥
देह गेह दारा पुत्रीं ॥ जैसी वाढलि मैत्री ॥ तैसी सर्वत्र भूतमात्रीं ॥१॥
जैसें स्वप्नींचें दुरित ॥ कैचें वो त्या प्रायश्चित्त ॥ तैसें प्रबोधीं विश्व-मुक्त ॥२॥
प्रारब्धें वर्ते देहीं ॥ देहातीत तूं पाहीं ॥ सत्य स्वानंदें सौख्य़िं राहीं ॥३॥
देहींचें कर्माचरण ॥ तितुकें ब्रह्मार्पण ॥ करिं कां सांडुनि मी-तूंपण ॥४॥
निजानंद चित्सागरी ॥ रंगे होउनि लहरी ॥ उरली अद्वैतासि नाहीं उरी ॥५॥

पद २९०. (राग-धनाश्री, चा. न्हाणी न्हाणी या निर्मळा)
सिद्ध स्वानंद कीर्तनीं गाय नाचे ॥ जेथें वाद ठेले श्रुतिगायनाचे ॥
कोण वर्णी त्या विलासवैभवाचे ॥ ऐसें भागवतीं भगवान बोले वाचें ॥धृ०॥
वेदवाक्यें सत्कर्मपंथें चाले ॥ भेदवादी षडैवरी विलया नेले ॥
खेदकारी नाकळे दुरी केले ॥ सद्नुरु बोधें स्वानंदसौख्यें डोले रे ॥१॥
शांति शोभली विश्रांति आली खेळा ॥ द्दश्य द्दष्टत्वें चिन्मात्र झाला डोळा ॥
निजानंदें बाणली अतर्क्य लीला ॥ रंगीं रंगला हो अनिर्वाच्य सोहळा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP