मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २५१ ते २५५

पदसंग्रह - पदे २५१ ते २५५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २५१.
स्मरतां नित्य हरी ॥ मग ती माया काय करी ॥धृ०॥
नामरुपात्मक सकलहि नाशक ॥ निश्वय हा विवरी ॥१॥
शांति दया पर श्रवणीं सादर ॥ भ्रांति भ्रमा न वरी ॥२॥
सहज पूर्ण निज रंगीं रंगुनि ॥ सद्नुरु पाय धरी ॥३॥

पद २५२.
चित्‌-उदधी निज रंग ॥ भासे जगदाकार तरंग ॥धृ०॥
माया मृगजळ शाश्वत नसतां ॥ धांवति जेविं कुरंग ॥ भासे ॥१॥
द्दग्‌ भ्रम योगें रज्जु न जाणें ॥ वाटे तीव्र भुजंग ॥ भासे ॥२॥
पुत्र कलत्र गणगोत्न मित्र धन ॥ गज रथ धेनु तुरंग ॥ भासे ॥३॥
सहज पूर्ण निज रंगीं रंगुनि ॥ होय सहज भवभंग ॥४॥

पद २५३.
अवघें सुख पाहीं सुख पाहीं ॥ दु खचि किमपी नाहीं ॥धृ०॥
शुकनलिका-न्यायें तूं । करिसी संकल्पाचा हेतू ॥१॥
जें जें भासत सृष्टीं ॥ देखें परमात्मा तो द्दष्टीं ॥२॥
सुखही नेणिव जेथें भरला ॥ पूर्ण रंग निज तेथें ॥३॥

पद २५४.
विरळा सज्जन तो सज्जन तो ॥ मुनिजनमनरंजन तो ॥धृ०॥
निरहंकृति निष्कामें ॥ ब्रह्मीं ब्रह्मार्पण सत्कर्में ॥१॥
शिव होउनि शिवभजनीं ॥ अखंड तन्मय चिन्मय-भुवनीं ॥२॥
तरोनि तारक झाला ॥ पूर्ण निजानंदें रंगला ॥३॥

पद २५५. [पाच धातुमूर्ति लक्ष.]
ब्रह्मीं चिद्वत्ती जडली तेव्हां पुण्यें हीं घडलीं ॥धृ०॥
त्निभुवनिचीं दैवतें पुजिलीं लक्ष कन्यादानें केलीं ॥ योग याग याग क्रिया व्रतें तपें तीर्थे गोदानें द्विजां दिधलीं ॥
जांबुनद कनक मेरुभार एक प्रयुत दानें झालीं ॥ दहा सहस्र वर्षें वाराणशीवास करुनियां तीर्थें आलीं ॥१॥
समुद्रवलयांकित पृथ्विचीं तीर्थं यथायोग्य घडलीं स्रानें ॥ सत्पात्नें पाहुनि ब्राह्मणांसि दिधलीं सदक्षणा भूमिदानें ॥
यज्ञादिक क्रिया यथाविधि सांग करुनि श्रीहरिपुजनें ॥ संसारसागरापासोनि पितरां उद्धरिलें आत्मज्ञानें ॥२॥
नित्यानित्य विचार विलोकुनि मुमुक्षु-दशे आला ॥ साधुसमागम सच्छास्रसंगमीं सुस्रात होउनि ठेला ॥
अनत ब्रह्मांड हरिहरब्रह्मादिक पुजेसि अर्ह झाला ॥ सहज पूर्ण निजरंगीं रंगुनियां आला न तो गेला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP