मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
अष्टक ३

पदसंग्रह - अष्टक ३

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[मालिनी. गण न, न, म, य, य.]

प्रळयरूप अघातीं चित्त निश्वीत राहे ॥ न चळत निजबोधें जें सुखें द्वंद्व साहे ॥
बहुवस सुख होतां भग बोधासि नाहीं ॥ तुज गुरु निजरामा मागणें हेंचि पाहीं ॥१॥
विविध जन न भासे भेद नासूनि नेला ॥ निजरुप जगदात्मा नित्य होऊनि ठेला ॥
रज तम गुण गेले बाणली शांति देहीं ॥ तुज० ॥२॥
गमन चरणचालीं चालतां तूचि होसी ॥ श्रवण करुनि बिंबे शब्दही सर्व देशीं ॥
स्वजन विजन कांहीं चक्षुतें भेद नाहीं ॥ तुज० ॥३॥
दवडुनि दुरिना आतां तोडिलें संगदोषां ॥ शाम विशम न मानी आणिली बुद्धि येशा ॥
मन समुळ विरालें सच्चिदानंदडोहीं ॥ तुज० ॥४॥
परधन विषवल्ली चित्त मानी विरागें ॥ अणुभरि न शिणे हा वैभवाचेनि त्यागें ॥
नवविध भजनाची मानिती प्रीति दाही ॥ तुज० ॥५॥
समुळ मुळ जगाचें मानलें मीच साचें ॥ अतिशय मन मानी आदरी वेद वाचें ॥
जन वन सम मानी सर्वदां भेद नाहीं ॥ तुज० ॥६॥
तव पदिं मन माझें चिंतितां नित्य रंगे ॥ तव गुण वदतांही शोक संताप भंगें ॥
अतिशय विषयांची आस चित्तासि नाहीं ॥ तुज० ॥७॥
निगमवचन पाळी चित्त आनित्य गाळी ॥ अनुदिन तनु रंगीं रगली सर्व काळीं ॥
क्षणभरि न विसंबें साधुसंगासि पाहीं ॥ तुज० ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP