पदसंग्रह - पदे ८१ ते ८५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ८१.
करविरपुरवासिनि ये वो ये मातुर्जननी ॥
दीनदयाळे भक्तवत्सले सुरवर वरदायिनी ॥धृ०॥
भव-कोल्हासुर दमनी नगनंदिनी त्रितापशमनी ॥
महालक्ष्मि स्थूलसूक्ष्मि व्यापुनि अससी आदिभवानी ॥१॥
अनन्य शरणागत प्रतिपाळक दिनरजनिं निजभजनीं ॥
सुखमय करिसी षड्रिपु दानवकुळ-भंजनी ॥२॥
अशनीं शयनीं गमनागमनीं जनीं विजनीं स्वस्थानीं ॥
सहज पूर्ण निजरंग रंगवीं ध्यानीं मनीं ह्रद्भुवनीं ॥३॥
पद ८२.
करविरपुरवासिनी वेदां न बोलवे वाचा ॥
ब्रह्मादिक सुरवर नर गोंधळ घालिती गाती जियेचा ॥१॥
आदिशक्ति महंमाया माझी महालक्ष्मी ॥
अनंत कोटी ब्रह्मांडें भरलीं स्थूल सूक्ष्मीं ॥२॥
कुळिची कुळदेवता निजानंदं रंगली ॥
पुनरपि जन्ममरण हे दुर्वार्ता भंगली ॥३॥
पद ८३.
माझा राम पूर्णकाम सोयरा सखा ॥धृ०॥
वर्व-व्यक्तिशून्य ॥ चिद्धन चैतन्य ॥ न वर्णवे सहस्रमुखा ॥१॥
सच्चिदानंदाद्वय ॥ चिद्रुप चिन्मय ॥ दुर्लभ जो शत-मखा ॥२॥
सहज पूर्ण रंग ॥ निजानंद नि:संग ॥ कांरण ब्रह्मसुखा ॥३॥
पद ८४.
वटवट बहु करिसि किति शिकोनि ऐकुनि गोष्टी ॥
कष्टी झाला तोहि सृष्टिकर्ता परमेष्ठी ॥१॥
पार कळेना अहकार गळेना ॥
आत्म-फळें परमामृतवृक्ष फळेना ॥धृ०॥
योग याग सकळ कळा जप तप व्रत विद्या ॥
यज्ञ दान धर्म कर्म कारण मोहमद्या ॥२॥
निजरंगें चित्समुद्र अक्षय स्वयंभ ॥
आदि अंत रहित स्वहित आब्रह्मस्तभ ॥३॥
पद ८५. (बोलणें फोल झालें या चा.)
हरि ह्मणे ब्राह्मण माझे ब्रह्मरूप मज प्रियकर जे ॥धृ०॥
करावया जगदोद्वार ॥ ब्राह्मणरुपें म्या अवतार ॥
पूर्ण धरिलासे साचार ॥ ह्मणवुनि नाम धरामर जे ॥१॥
ब्राह्मण वेदोनारायण ॥ परब्रह्म परायण ॥
त्यांच्या याग यज्ञें सुरगण ॥ आपण तृप्त निरंतर जे ॥२॥
दर्भाग्रीं हे ध रिली सृष्टी ॥ सूर्यस्थानीं तपें छाटी ॥
पतसामर्थ्यें महा हट्टी ॥ शापानुग्रह क्रूरतर जे ॥३॥
सष्टिवरि हे सृष्टी केली ॥ एकी सागर भरिला चुळीं ॥
ऋषीगण वांचविले दुष्काळीं ॥ पेरुनि साळी सत्वर जे ॥४॥
गायात्रेच्या मत्रें जाण ॥ करिती शुद्राचा ब्राह्मण ॥
तिहीं वर्णाचे गुरु आपण ॥ निर्गुण पूर्ण परात्पर जे ॥५॥
ज्यांच्या चरणतीर्थं दोष ॥ समुळीं नाशती नि:शेष ॥
विजय लक्ष्मी पुण्य विशेष ॥ पावन करिती पामर जे ॥६॥
ज्यांचा पदरुह म्यां निजांगें ॥ ह्रदयीं साहिला निजरंगें ॥
भूषण मिरवीं कृपापांगें ॥ भजनीं होउनि तत्पर जें ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP