पदसंग्रह - उद्रारलहरी
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
तंतू तंतुपणें न जाणत पटा नामा रुपा नातळे ॥ माती नेणत त्या घटासि सहसा मातीस माती मिळे ॥
किंवा हेम नगासि जाणत नसे कल्पांत झाला तरी ॥ ब्रह्मीं विश्व तसें नसोनि विलसें प्रत्यक्ष भासें जरी ॥१॥
भासे सर्प सर्व विवर्त रज्जुवरि तो रज्जूसि ठावा नसे ॥ स्थाणू स्थाणुपणें न जाणत नरा स्थागूव तो कीं असे ॥
नेणे शक्तिरुपें स्वयेंभस्वरुपें ते शुक्तिका यापरी ॥ ब्रह्मीं विश्व मृगांबु जेविं विलसे या सूर्यरश्मीवरी ॥२॥
काष्ठें जेंगट ताडितां रव करी गर्जोनि उच्च स्वरें ॥ तैसे अल्पमती अहंकृति गुणें देताति प्रत्युत्तरें ॥
भगवद्भक्त परापराध साहती सर्वात्मभावें सदां ॥ नोहे शब्द विखंड खंड करितां त्या हेमपात्रीं कदां ॥३॥
एकीं एक असोनि मूख अपुलें भासे दुजें दर्पणीं ॥ वाटे सर्वहि पीतवर्ण नयनीं ज्याच्या असे कामिणी ॥
अद्वैतीं जग द्वैत हें दिसतसे संकल्पयोगें जनां ॥ तात्पर्यार्थ असाच कीं गमतसे ज्याची जशी भावना ॥४॥
झाला सिद्ध स्वयंभ दर्पण तवा एकाच लोहांतरीं ॥ विद्वद्दर्पण स्वप्रकाश-घन तो सम्मूख घेतां करीं ॥
अज्ञानी नर तो तवा मलिन या संतप्त तापत्रयें ॥ श्रोत्रीं स्वानुभवी गुरू जरि मिळे तैं शुद्ध तोही स्वयें ॥५॥
जरि पर पुरुषातें भोगणें स्वस्थ चित्तें ॥ तरि करिं शिर ध्यावें छेदुनीयां स्वहस्तें ॥
विषवत् विषयांतें मानुनी साधुसंगें ॥ हरिसि शरण जावें बुद्धिनें सानुरागें ॥६॥
धेनुचें मन वत्स टाकुनि वना तें जाईना हो कदां ॥ ते सेवी तृण जीवना परि मनामध्यें वसें सर्वदां ॥
तैसें चित्स्वरुपीं निमग्न मन हें होऊनियां तो मुनी ॥ लीलाविवहि दीनबंधु जगदुद्धारी दिसे या जनीं ॥७॥
देशांतरा कृपण ठेवुनि जाय ठेवणीं ॥ जैसा मनांत धन आठवितो क्षणोंक्षणीं ॥
ज्ञानी प्रपंच करिताति असेंच भासतें ॥ सच्चित्सुखीं सतत मानस तें विलासतें ॥८॥
उडे वावडी वातवेगें आकाशीं ॥ असें सूत्र हातींच तें निश्वयेंसीं ॥
तसें वर्ततां देह प्रारब्धयोग ॥ मुनींची मनें रगलां पूर्ण रगें ॥९॥
जैशी शील पतिव्रता अवयवां झांकनि वर्ते जनों ॥ किंवा सोपडल्या दरिद्र अवघें द्रव्याढय जो तो वनीं ॥
तैसे सज्जन आपुल्या गुणगणां जाणोनि आच्छादिती ॥ देहीं बाळ पिशाच्च उन्नत दशा दावोनिया वर्तती ॥१०॥
पुष्पांची वनवाटिका जगरुपें शोभे विवित्राकृती ॥ नानारंग सुरंग जीवकुसमें देती अनेकद्रती ॥
त्याहीमाजिं सुसेव्य दिव्य सुमनें मानें सुगबे भलीं ॥ झालीं धन्य स्विकारिलीं गुरुवरें तीं चित्पदीं शोमलीं ॥११॥
पुण्याचें फळ सौख्य शाश्वत मना म्हावें असें आवडे ॥ पापावें फळ दु:ख लेश कवणा स्वप्नांतरीं नावडे ॥
यत्नें दुष्कृत आचरोनि सुख हें कां इच्छिती पामरें ॥ पुण्याचा लवलेशहि न घडतां हें दु:ख वाटे पुरे ॥१२॥
अहं देही ऐशा अनृत वचनें दोव घडती ॥ महत्पापें येणें येणें अधम नरकीं जीव बुडती ॥
अहं ब्रह्मास्मी हें वचन वदतां सत्य वचनीं ॥ महत्पुण्यें येणें सुजन रमती सौख्यसदनीं ॥१३॥
आत्मस्वरूप ह्रदयीं सम साम्य आहे ॥ अज्ञानही सतत जेथ समग्र राहे ॥
जेथें निबीड तम तेथ रविप्रकाश ॥ आश्वर्य हें गमतसे मजला विशेष ॥१४॥
काष्ठीं अग्नि असोनि गुप्त न दिसे कोणासि कामा नये ॥ केल्या मंथन यज्ञ होमहवतें सर्वांसि कार्यासि ये ॥
तैसा हा ह्रदयस्थ राम नकळे देहात्मबुद्धी जना ॥ सारासार विवेक पूर्ण करितां ये प्रत्यया सज्जना ॥१५॥
गोहत्त्या शत एक विप्रवध तैं ऐसें श्रुती बोलती ॥ ब्रह्मत्या शत एक स्रीवध घडे तेव्हां करी त्यांप्रती ॥
स्रीहत्या शत बाळवध तैं हें निश्वयें जाणिजे ॥ बाळेंही शत एक त्यासम मृषा वाक्यें मुखें बोलिजे ॥१६॥
शब्दे मृत्यु मृगा गजासि स्परशें रूपें पतंगा घडे मीना मृत्यु रसें सुगंध कमळीं घेतां अली सांपडे ॥
एकेकाविषयीं सहा धरुनियां हे पांचही नाडती ॥ जो या सेवित नित्य पंच विषयां त्य ची कसी हो गतीं ॥१७॥
माया मोह नदींत विश्व पुलिनीं मिश्रीत चिलार्करा ॥ दाहींचें निवडील तो चतुर हा इत्यर्थ झाला खरा ॥
तेथें देह-भिमान मत्त गज हा कांहींच कामा नये ॥ मुंगीतें निरहंकृती निवडुनी घेईल हा निश्वयें ॥१८॥
घटेमाजिं निनाद गंध सुमनीं माधुर्यता शर्करीं ॥ नेत्रा आंतिल बाहुली न निवडे ते शुभ्रता कर्पुरीं ॥
किंवा वायु नमीं सतेजपण हें मुक्ताफळीं निश्चयें ॥ विश्वीं राम तसा नये निवडितां तो जाणिजे प्रत्ययें ॥१९॥
विष्णूजामात तीर्थं सकळहि उदरीं दिव्य रत्नावसौटा ॥ लक्ष्मी कन्या जयाची त्रिभुवन वदनीं कीर्तिचा घोष मोठा ॥
तेथें जातां तृषार्ती चुळभरि जळही प्राप्त कोणासि नाहीं ॥ तैसा तो शब्द ज्ञानीं निजसुख दिसे लेशही तेथ कांहीं ॥२०॥
भासे प्रत्यक्ष मिथ्या जग मृगजळ हें आणि अंतीं नसोनी ॥ यातें जो सत्य मानी नर मृगपशु तो मानवीही असोनी ॥
राहू द्दष्ठी दिसेना रवि-शशि-ग्रहणीं तो कळे जेविं तैसा ॥ आत्मा सर्वत्र व्यापी नकळत अबळां तो अहे नाहिं ऐसा ॥२१॥
भोंवे वक्र कुलालचक्र वरि त्या माजी बसे येउनी ॥ ते तेथूनि न हालतां दिसतसे भोंवे असी लोचनीं ॥
प्रारब्धास्तव वर्तणें जनिं वनीं देहीं दिसे त्यापरी ॥ विद्वद्वर्य सदां सुनिश्वळ निजानंदें स्वरूपांतरीं ॥२२॥
मिष्टान्नांत विषयप्रयोग जहाल्या ज्या नेणवे निश्वयें ॥ तेव्हां त्या क्षुधितास काय कळतें सेवील नि:सशयें ॥
संज्ञा होत तरीच ठाव अवघा टाकोनियां तो पळे ॥ तैसें या विषयांसि जाणुनि पुन्हा ज्ञानी तयां ना-तळे ॥२३॥
ज्ञानी पंडित वेदपाठक मुनी याज्ञीक हो ज्योतिषी ॥ संन्यासी वनि वानप्रस्थ अथवा शास्त्रज्ञ किंवा ऋषी ॥
योगी साधक ब्रह्मचर्य अगमीं मौनी समस्तांप्रती ॥ होतां संग अनर्थ मूळ वनिता सिद्धां बोले श्रुती ॥२४॥
पव्कान्नीं मृत मक्षिका पडलिया तें अन्न भक्षी तया ॥ होती क्लेश विशेष वांतिसमयीं संत्रास कर्त्री क्रिया ॥
स्वानंदामृत-भोजनी जरि पडे हे कल्पना-मक्षिका ॥ तेव्हां तो परमार्थ व्यर्थ ह्मणतां संदेह मानू नका ॥२५॥
स्वस्थानी सहजें अहंकृतिबिजें ज्ञानाग्निनें भर्ज्लिलीं ॥ होती प्रस्तुत तीं निवारणसुधें जन्मांतरा वंचिलीं ॥
पेरायासि अयोग्य तें कृषिबलें जाणोनियां नर्जिलीं ॥ ब्रह्मीभूत तरोनि तारक जनां होऊनियां संचिलीं ॥२६॥
दावी दर्पण ज्यासि नापित तया भासे स्वरूप स्वयें ॥ याला केवळ तो तवा मलिन या पृष्ठीकडे निश्वयें ॥
सांगे सर्व परोक्ष उत्तम कथा बोधोनि श्रो जना ॥ आंगें आपण बोधरूप नव्हतां विश्रांति कैंची मना ॥२७॥
मोजी माप अमूप धान्य परि तें अंतीं रिकामें पडे ॥ वक्ता काय तसा प्रसण पडतां कामादिकां सांपडे ॥
गोणी पूर्ण भरे सवेंचि रिचवे तेही पडे हों रिती ॥ श्रोत्यांच्या सहसा क्षणीक श्रवणीं तैशा वसात या स्थिती ॥२८॥
स्वातीचा घत सुक्तिकेंत पडतां होताति मुक्ताफळें ॥ झालें वीष विशेष व्याल वदनीं तें कायकेलें जळें ॥
सर्व ब्रह्म ह्यणोनि बोध करितां सच्छिष्य संबोधला ॥ दुष्कर्मीं नर वर्णसकर करी शिस्नोदरीं वेधला ॥२९॥
शोभे वैराग्य भाग्यें उपरम समता भक्तिची प्रीति लागे ॥ सत्कर्मींही न भागे अबल जन तयां योग्य सन्मार्ग सांगे ॥
षडैवरी दूरि मागें करुनि सदय जो ज्ञानि सच्छास्त्रयोगें ॥ झाला, चित्सौख्य रंगें त्रिभुवनविजयी ब्रह्मविद्वर्य आंगें ॥३०॥
न होती हे कांहीं गुणमयी तयीं ब्रह्मचि असे ॥ तपापासूतीही जग ह्मणति वेदागम असे ॥
सुवर्णापासूनी उपजत तदक्यें नग वसे ॥ पहातां ये रीती अवसरचि भेदा न गवसे ॥३१॥
उपादान मातीच जैसी घटातें ॥ उपादान तंतुत्व जैसें पटातें ॥
विना ब्रह्म येना जग प्रत्ययातें ॥ उपादान तें नेमिलें सत्य यातें ॥३२॥
नगीं द्दष्टी मुष्टी कनक नुसतें सांपडतसे ॥ उपादानत्वें तें म्हणवुनिच ठायीं पडतसे ॥
असें सर्वावृत्ती चिदुदधि जग स्थान गवसे ॥ म्हणूनी ब्रह्मीं हें जग म्हणति वेदाऽगम असे ॥३३॥
स्नानें पानें दोष गंगा निवारी ॥ कीर्णद्वारें इंदु संताप हारी ॥
नाशी दैन्या कल्पितां कल्पलता ॥ सत्सगें या नाश पावे समस्तां ॥३४॥
गिरिवर सह मेरू कज्जलें सिंधुपात्नीं ॥ सुरवर तरूशाखा लेखुनी भूपिपत्रीं ॥
सतत लिहित आंगें शारदा आदि माया ॥ तरि तव गुणसीमा नेणवे रामराया ॥३५॥
विमळ वाढविसी जरि सत्वरे ॥ तरिच पावसि पूर्ण महत्व रे ॥
गुरुपदांबुज सत्वर सांपडे ॥ परम तत्व निजांगिंच सांपडे ॥३६॥
दुर्योधनादि शिसुपालहि पापकारी ॥ वरें करुनि जगदीश तयांसि तारी ॥
देऊनियां स्वपद मुक्तिपदासि नेलें ॥ वैचित्र्य काय परि पावन भक्त केले ॥३७॥
पिता राम माता विदेहात्मजा हो ॥ सखे बंधु माझे हरीभक्त पैं हो ॥
करी कर्म वेदोक्त तो मित्र जाणा ॥ तयाच्या बळें घाव घाली निशाणा ॥३८॥
दासीस पुत्र दिधला जगदैक-पाळें ॥ श्रीपाद सेवना तया घडलें कपाळें ॥
त्या वैभवेंकरुनि नारद वद्य झाला ॥ आत्माचि अद्वितीय तो गमला अजाला ॥३९॥
केलीं तीर्थ न पूर्वीं द्विजहि न पुजिले होमिलें द्रव्य नाहीं ॥ ध्यानें विध्युक्त पूजा निशि-दिनिं भजतीं नार्चिला देव तोही ॥
दानें गो भूमिरत्नें फळ-जळ-वसंत नार्पिलों याचकांहीं ॥ ते दु:खी नित्य देहीं न चुकत पडती जन्मधाराप्रवाहीं ॥४०॥
जनीं काननीं सागरीं पर्वताग्रीं ॥ अमित्नीं सुमित्रीं त्रिलोकीं समग्रीं ॥
अवस्थात्रयीं वर्ततांही त्रितापा ॥ नुपेक्षी कदां पूर्व पुण्यप्रतापी ॥४१॥
विद्याबळें विनयही अति मान्य लोकां ॥ ते बाह्म भूषण असे बरबें विलोका ॥
नारायिला जरि हरी द्दढ अंतरीं हो ॥ शृंगारिली मृततनू परि ते खरी हो ॥४२॥
या लोकिंचें जीवित साच नाहीं ॥ कां पापकर्मीं पडिजे प्रवाहीं ॥
क्षणार्ध सौख्यासरिसेंच मागें ॥ अकल्प दु:खावह भोग लागे ॥४३॥
मी देह माझीं धन पुत्र जाया ॥ हे वारि ओझें स्वपदासि जाया ॥
उपाय सेवा गुरुराजवाची ॥ तारी भवाब्धींत दया जयाची ॥४४॥
परिस विनवणी हे सद्रुरु देवराया ॥ जळति सकळ कर्में आदरीं त्या उपाया ॥
पुढति जनन मृत्यु सर्वयाही न लागो ॥ मन तव पदपद्मीं मी-पणेंवीण जागो ॥४५॥
अष्टौपाळ किरीटि नित्य भिडतां ज्याचे पडीं दाटणी ॥ ब्रह्मा शंकर ध्यात नारद सदां शेष स्तची आननीं ॥
योगीही सनकांदि वंदिति शिरीं व्यासादि जे का मुनी ॥ तो हा भक्तपदें हरी निजकरें क्षाळी शिरीं वंदुनी ॥४६॥
निर्धारें रमतां मनादि करणां जो नाकळे तत्वता ॥ झाला तोचि सगणरूप जन एह लावावया सत्पथा ॥
नंदाचे घरिचीं वळीत हरि हा वृंदावनीं गोधनें ॥ दभा दूरि असे कदां न गवसे तीर्थें तपें साधनें ॥४७॥
सारासार विचार, नैश्वर असे तें, वारि सर्वापरी ॥ चित्तातें शमवूनि नित्य विवरीं श्रीसद्नुरूच्या घरी ॥
तेव्हां दु:खनिवृति सौख्य भरिते अब्रह्मतेच्या शिरीं ॥ भावाभावविना निरंकुशपदीं साधाज्य ऐसें करी ॥४८॥
कांता कांचन पुत्न मित्र दुहिता जामात माता पिता ॥ बंधू इतर पीशुनें बहुजणें संख्या नसे मोजितां ॥
देहांतीं सकळीक मायिक नरा सांडूनि येती घरा ॥ अतीं सोडविता नसे रघुविरावांतूनियां दूसरा ॥४९॥
मिथ्या वाद घडे आंगी अहता जडे ॥ दोषी द्दष्टिपुढें समत्व न घडे वैराग्य तेंही बुडे ॥
शांती सौख्य क्षमा दया उपरती सद्भाव तोही उडे ॥ ऐसा योग समस्त येउनि घडे सत्संगही नातुडे ॥५०॥
सुखोर्मीच्या मेळें नुगळति जळें नेत्नकमळें ॥ गळा बाष्पें दाटे पुलक उठती सात्विक बळें ॥
चळे कांपे देहीं नुपजती मनीं मोहपटळें ॥ गळे संसाराच्या स्मरति हरिचीं पादयुगुळें ॥५१॥
काया काय खरी मृगांबुलहरी हे स्वप्निंची सुंदरी ॥ आस्था कोण घरी खरीच दिसते हे जेविं वोडंबरीं ॥
पाहे भर्तुहरी त्यजूनि अवघे वीरक्त चित्तांतरीं ॥ तूंही याचपरी करूनि भज रे कोदंड ज्याचे करीं ॥५२॥
कैंचा मोक्ष अमोक्ष सर्व लटिका कैंचा मुळीं बंध हा ॥ कैचा रे जगडंब कोठुनि असे निर्माण नाहींच हा ॥
स्वप्नांचा उगमार्थ काय वदसी मूढाप्रती भास हा ॥ निद्रा कारण जागृतीं न पहातां मानीं मनीं व्यर्थ हा ॥५३॥
अहंकारा एकया धरुनि तुज तूं देह म्हणसी ॥ स्वरूपेंसी कैसी सद्दढ लटिकी भ्रांति धरिसी ॥
जगद्यापी कृष्ण स्मरण करिं पां तूं कवण रे ॥ वृथा मोहें नोहे भ्रमित निजरूपा न विसरें ॥५४॥
नभा अंभा तेजा क्षिति मरुत व्यापी निबिड जो ॥ स्वयें चाळी पाळी अखिल त्निगुणातीत पर जो ॥
सरेना विस्तारें अज अमुप जो त्या न विसरें ॥ स्मरें सोहं तो मी शबल तनु हेमीं न ह्मण रे ॥५५॥
स्वरूपा निर्लेपा सहज निज कां बा विपरसी ॥ अनित्या नि याचा सद्दढ अभिमानी ह्मणविसी ॥
अहा ऐसा कैसा नवल लटिका मोह पडला ॥ असा देहीं मी हा ह्मणसि न दिसे लाज तुजला ॥५६॥
अनंता नामाचा रघुविर जनांमाजि वसतो ॥ विवेकी लोकांला प्रकटचि मनामाजिं दिसतो ॥
तनू पूरीं वर्ते पुरुषचि तया लागिं ह्मणती ॥ तया लक्षी जो तो तद्रुपचि पहा व्यर्थ शिणती ॥५७॥
शिणावें काशाला जगदिश तरी बाह्यभितरीं ॥ तिहीं लोकांमध्यें सकळिक जिवां पालन करी ॥
कळेना लक्षेना जंववरि जंववरि नसे ज्ञान पुरतें ॥ असारा त्यागावें तदुपरि पुढें काय उरतें ॥६०॥
सायुज्यतेप्रति तनूसमवेत जो या ॥ हें काय़सें जड असे मजला त्वजाया ॥
नाहीं जडीं विषमता निज चिद्रसाची ॥ पाणीच तें कठिण गार जसी न साची ॥६१॥
विषय इंद्रिय बुद्वद-तोय मी ॥ ह्मणुनि जो स्वसुखीं स्थिर तो यमीं ॥
न सलिलीं सलिलाकृति कामना ॥ इतर संयम त्या वरि काम ना ॥६२॥
प्रियें कदां दु:खकरें न होती ॥ प्रयें मना व्याकुळता न देती ॥
प्रियें बहू साम्य तयासि नाहीं ॥ तो प्रिय सर्वोत्तम एक पाहीं ॥६३॥
भासें मिथ्यांबु जैसें दिनकर किरणीं कक्षितां साच नाहीं ॥
चित्रें भिंतीबिनाहीं अणुहि परि नसें अन्यथा जाण कांहीं ॥ तैसा लोकत्रयींही रथुविर भरला साक्षि या चारि साही ॥
पाहा प्रत्यक्ष येथें हरिविण दुसरें वागवी कोण दाही ॥६४॥
गोपाळीं मन रातलें मग तयां अप्रीति कामीं सदां ॥ सौख्यें गोवळ. संगतीं विचरतां विक्षेप नाहीं कदां ॥
मोक्षाची परि चाड सोडुनि निरापेक्षें सवेंरातलें ॥ स्वानंदीं रत सर्वदां अतिशयें नामामृतें मातलें ॥६५॥
फलत्यागें वर्णाश्रम उचित कर्में द्दढ करीं ॥ निषेधें पैं काम्यें प्रतिकुल तुतें, चाड न धरी ॥
अशा, स्त्रीची चर्या करुनि परधर्मीं विचरसी ॥ बलात्कारें कैसा प्रकट दिवसा रात्र करिसी ॥६६॥
सर्वीं सर्वत्र वस्तू सम विषम नसें जंगमीं स्थावरीं हो ॥ तेथें हे रंग नाना विलसति असत, ऐक्यता अंतरीं हो ॥
याचा सिद्धांत ऐसा शुभ अशुभ क्रिये सारिख्या वर्णव्यक्ती ॥ झाल्या कर्मानुसारें विविध प्रकृति या मुणभेदें प्रयुक्ती ॥६७॥
अनुभव नसतां हो शब्दब्रह्मेंकरूनी ॥ निरतिशय सुखातें पावले कोण ज्ञानी ॥
सफलित तरु जैसा बिंबला पूर्ण डोहीं ॥ मधुर सफळ स्वादा पावला कोण पाही ॥६८॥
स्वपति सन्निव वर्तत सुंदरी ॥ परि पती वचनें न धरी शिरीं ॥
तदुपरी निगमागम जाण तो ॥ परि हरी भजनेंविण शीण तो ॥६९॥
जंववरि मन रामीं रातलें पूर्ण पाहीं ॥ तंववरि प्रणवांगें साधनें व्यर्थ पाहीं ॥
ह्मणवुनि सकलांगें राघावातें भजावें ॥ ह्रदयकमळकोशीं रामरूपा भरावें ॥७०॥
विशाळा त्या माळा द्दढ नरकपालादिक गळां ॥ कशा अग्निज्वाळा विषम निढळीं शांति बहळा ॥
निजांगी वेलाळा हिम अचळ बाळा निजकळा ॥ असा शंभू भोळा ह्रदयकळामाजिं कवळा ॥७१॥
माथा जान्हवि दिव्य लाघवि कळा भाळीं शशीची कळा ॥ कार्णीं कुंडल मुंडमाळ ह्रदयीं कंठीं विषें सोज्वळा ॥
भस्माचा उधळा गजाजिना गळां वामें असे आबला ॥ आंगीं भूषित दीर्घ व्याळ दिसती जे वर्षती गारळा ॥७२॥
कमल समल पंकावांचुनी उद्भवेना ॥ हिमकरहि कलंकी दोष त्याचा ढळेना ॥
मुकल निकर बिंबीं अंवकारीं दिसेना ॥ अतुल मुख हरीचें तूलना हे घटेना ॥७३॥
तुझ्या रंगणीं शांति विश्रांति पावे ॥ तुझ्या पादपद्मीं क्षमाही विसावे ॥
सुखावे निजांगीं हे दयाहीफलासी ॥ निजानद तूं सद्नुरू चिद्विलासी ॥७४॥
तुझ्या कामनें काम निष्काम वागे ॥ मनोमंदिरीं सत्य निर्वाण जागे ॥
कृपावैभवें भक्त कैवल्यवासी ॥ निजानंद तूं सद्नरू चिद्विलासी ॥७५॥
पदीं रंगलों चित्पदीं मी निवालों ॥ नदी सागरी यापरी पूर्ण झालों ॥
अजत्वा प्रबोधूनियां द्वैत नेसी ॥ नजानंद तूं सद्नुरू चिद्विलासी ॥७६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP