मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २११ ते २१५

पदसंग्रह - पदे २११ ते २१५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २११.
ये रे आत्मया रामा ॥ कृष्णा मेघ:शामा ॥
पुराण पुरुषोत्तमा ॥ इंदिरावारा ॥धु०॥
अच्युता हरी ॥ माधवा मुरारी ॥
भक्तकाज-कैवारी दिनबंधु ॥१॥
गोपाळा गोविंदा ॥ नरसिंहा मुकुंदा ॥
पूर्ण परमानंदा ॥ पद्मनाभा ॥२॥
केशवा वामना ॥ विष्णु जनार्दना ॥
मधुसूदना प्रद्युम्ना ॥ त्रिविक्रमा ॥३॥
गोवर्धनोद्धरणा ॥ अधोक्षजा संकर्षणा ॥
अनिरुद्धा नरायणा ॥ करुणासिंधु ॥४॥
उपेंद्रा दामोदरा ॥ ह्रषिकेशा श्रीधरा ॥
वासुदेवा विश्वंभरा ॥ विश्वरूपा ॥५॥
ऐसीं अनंत नामें ॥ स्मरतां सप्रेमें ॥
भक्तकाम-कल्पद्रुमें ॥ तारिले दोषी ॥६॥
तुझिया नामस्मरणीं ॥ रंगावी हे वाणी ॥
निजरंगें निर्वाणीं ॥ रक्षिता तूंचि रे ॥७॥

पद २१२.
हरि नारायण नाम वदाजी ॥धृ०॥
तथ्य पथ्यतर तत्व हें तत्वता ॥ नाम पाववितें पूर्णपदा जी ॥
जनन-मरण-संसरण-निवारण ॥ स्मरण हें जाणोनि दाजी ॥१॥
नित्य निरंतर सबाह्म अंतर ॥ नाम परात्पर हें सर्वदां जी ॥
ब्रह्म सनातन सच्चित्सुखघन ॥ गर्जन जा हरुनी मोहमदा जी ॥२॥
संशय अविश्वास घातकी विश्वास ॥ श्व्सोच्छ्वास घेऊं नेदी कदां जी ॥
नुपजें पश्वात्ताप हेंचि महात्पाप ॥ यास्तव ते भोगिति आपदा जी ॥३॥
व्याध अजामिळ चांडाळ तरले ॥ शास्त्रज्ञ भरले वेद-वादा जी ॥
अर्थवाद म्हणुनी संशयिं पडले ॥ सांपडले त्रिविध छेदभेदा जी ॥४॥
जनक सनकादिक व्यास वाल्मिक ॥ शुक नारदाची मुख्य हे संपदा जी ॥
सहज पूर्ण हरिनामें रंगले ॥ सेवुनियां निजानंदकंदा जी ॥५॥

पद २१३.
सबाह्माभ्यंतरिं रामीं रामदास यापरी रे ॥
अन्वय व्यतिरेकातित होउनि शोभति सचराचरीं रे ॥धृ०॥
रामीं रंगले ते रामदास नयनीं पाहुं ॥चरणसरोजीं त्यांच्या तन्मय होउनि राहूं ॥
पायसान्नामाजीं समरस घृत शर्करा गहूं ॥ निवडुं जातां रामचि झाला निरसुनि अहं सोहूं ॥१॥
मेघ-शाम निजराम वर्षत जळ गारा ते दास ॥ भिन्न भिन्न दिसतांही सबाह्माभ्यंतरीं पाणी त्यांस ॥
महा कल्पांत जळमय तेथें कैंचा भिन्न भास ॥ सगुणीं निर्गुण निर्गुणीं सगुण जनीं जगदाधीश ॥२॥
सच्चित्सुखमय चिन्मय स्वरूपीं तन्मय संत महंत ॥ ब्रह्मविद ते ब्रह्म जळगारा मूर्तिमंत ॥
ओतप्रोत परिपूर्ण संचले आदिमध्य न अंत ॥ रंग तरंग निजसुख जळनिधिमाजिं अभंग निवांत ॥३॥

पद २१४.
जळो त्याचें शाहाणपण ॥ मनुष्य म्हणवितो आपण ॥धृ०॥
मयुराचे सर्वांगीं डोळे ॥ आत्मदर्शनीं आंधळे ॥१॥
विद्या-कळा-गुणसंपन्न ॥ नाहीं स्वरुपाचें ज्ञान ॥२॥
नाचे देहबुद्धिच्या छंदें ॥ रंगेना निजानंदें ॥३॥

पद २१५.
तरि मग गडबड कां गडबड कां ॥ वावुगी बडबड कां ॥धृ०॥
चित्र तरुची छाया ॥ तैसी स्वरूपीं मिथ्या माया ॥१॥
स्वात्मसुकामृ तोदधी ॥ स्वयें मीचि यथार्थ बुद्धी ॥२॥
निरुपम अज नि:संग ॥ रंगीं रंगला निज रंग ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP