मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १९६ ते २००

पदसंग्रह - पदे १९६ ते २००

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १९६.
अच्युत तरू गुरुवर यातें प्राकृत जन ह्मणती आंबा ॥ सवदां सफळ गुरु भक्तांकुर ज्ञानकळा जगदंबा ॥धृ०॥
निजस्वरुप-स्मरण सुबिजें अंकुरला तरु सत्क्षेत्रीं ॥ नवविधा जीवनें करुनी विरूढला कोमळपत्रीं ॥
सत्कर्माचरणें प्रबळें विधियुक्त वेदशास्त्रीं ॥ सद्विवेक संरक्षक हा लक्षुनियां दिव्य सुनेत्रीं ॥१॥
सद्भाव सद्दढ मुळ योगें ब्रह्मांड व्यापुनि भरला ॥ वैराग्य वसंतकाळीं ब्रह्मस्तंभ मोहरला ॥
स्वानुभविं पूर्ण प्रबोधें पव्कदशे येउं सरला ॥ ज्ञानरसें गोडिसि येतां निज शेजे सहज मुराला ॥२॥
सेविति फळ सुकादिक पक्षी विद्वज्जन चिद्रसभोक्ते ॥ कुंजति नि:शब्द शब्दें व्यासदिक कोकिळ वक्ते ॥धृ०॥
अच्युत तरु सफळ सदांहि सच्चिदानंदाद्वय हो ॥ विषयी नर वायस यांतें मुखरोग आला पाहा हो ॥
निर्विकल्प कल्पतरु हा पिक लक्षुनि फोडिति टाहो ॥ श्रीमंत संत भोक्ते सेवितां तृप्त सदां हो ॥३॥
रंगले सहज निज रंगें ते पूर्णानंद विलासी ॥ परमामृत-फळ-रस-पानें संतृप्त ग्रासोग्रासीं ॥धृ०॥

पद १९७.
पाहतां समरीं शूर कळे ॥ योद्धा मारी भ्याड पळे ॥
भक्त शिखामणी संकट पडतां हरिभजनीं न टळे ॥धृ०॥
सम्मुख घाय रणीं ॥ सोशी परि सहसा न गणी ॥
पुढिल पाय न ठेवी मागें ॥ धीर उदार गुणीं ॥१॥
तनु मन जीवित रे ॥ कामीं काजीं तृणवत रे ॥
आसुरी परवीर मर्दुनि विजयी हरिच्रणीं रत रे ॥२॥
निश्वल. निष्कामी ॥ निर्भय असतां सगुण ग्रामीं ॥
सहज पूर्ण निजरंगें ॥ रंगोनि विचरे रणभूमीं ॥३॥

पद १९८.
पाहातां काय खरें ॥ शाश्वत मानिति तेचि खरे ॥धृ०॥
तुंबळ उदकें भरलीं दिसतीं ॥ मृगळींचिं उखरें ॥१॥
द्दश्य द्दष्टीं गंधर्वपुरीचीं ॥ भासति गिरिशिखरें ॥२॥
नाना रंगें लिहिलीं जैसीं गंगाजळिं मखरें ॥३॥

पद १९९. (चाल-अभंग)
आत्मज्ञानें विना ॥ मोक्ष कैंचा मना ॥
देहीं देहभावना ॥ द्दढ झाली ॥१॥
नित्य गंगा-स्रान ॥ केलीं तीर्थं नाना ॥
अहंकार वासना ॥ गेली नाहीं ॥२॥
होम हवनें दानें ॥ करितां अध्ययनें ॥
योग याग आत्मज्ञाने ॥ वीण व्यर्थ ॥३॥
अग्निस्पर्शें तृणें ॥ वरि वरि जळती तेणें ॥
अज्ञानवृत्ती कवणें ॥ करणें दग्ध ॥४॥
ब्रह्मार्पण सत्कर्में ॥ करितां अनंत जन्में ॥
निरहंकृति निष्कामें ॥ सद्नुरु भेटे ॥५॥
गुरुकृपें सुखोल्हास ॥ निजज्ञानीं सौरस ॥
निजरेंगें विश्वास ॥ धरितां होय ॥६॥

पद २००.
उमगला मजला हरि भक्तांपांसीं ॥धृ०॥
कोठें द्वारपाळ आंगें ॥ कोठें भाजीपान मागे ॥ शिरसागरवासी ॥१॥
कोठें उच्छिष्टें काढी ॥ कोठें धूतसे घोडीं ॥ भुलला त्या भक्तिसी ॥२॥
उच्छिष्टें गौळ्यांचीं खाय ॥ यशोदेसि म्हणे माय ॥ दुर्लभ देवांसी ॥३॥
चंदन सुमनें घेउनि आली ॥ देवें भावें मान्य केलीं ॥ ते कुब्जा दासी ॥४॥
देव भक्त ऐक्य-बोधें ॥ सहज पूर्ण निजानंदें ॥ रंगले स्वयं प्रकाशीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP