मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[शार्दूलविक्रीडित.]

एकांतीं सनुकूल इंद्रुवदनी जे दिव्य सौदामिनी ॥ झाल्या, ते जननीसमान नयनीं पाहूनि मानी मनीं ॥
किंवा पूर्ण सुवर्णकुंभ पडतां द्दष्टी न देखे कहीं ॥ या चिन्हीं परिपूर्ण तो नरहरी झाला लिलाविग्रही ॥१॥
निंदा स्तोत्र जनीं वनीं अनुदिनीं मानापमानीं कदां ॥ हर्षामर्ष नसे आनंदघन तो चित्तीं सदां सर्वदां ॥
पाहे चिद्धुवनीं जनार्दन जनीं जो व्यापिला सर्वही ॥ या चिन्हीं परिपूर्ण तो नरहरी झाला लिलाविग्रही ॥२॥
काया वाङमनसा अला शरण जो सर्वत्रहीं अर्पुनी ॥ एके गर्जततर्जनादि करुनी पाडी अपायीं वनीं ॥
हे दोघे सम भासती निजरुपीं निर्वैर सर्वै मही. ॥ या चिन्हीं० ॥३॥
कर्मीं ब्रह्म प्रतीति सांग करितां विध्युक्त वर्णाश्रमीं ॥ निष्कर्में निरहंकृती स्थिरचरीं भगवत्कृपें जो नमी ॥
आत्मत्वीं जग देखणें नग जसा हेमीं नसे अल्पही ॥ या चिन्हीं० ॥४॥
स्वानंदामृत सेवुनी अप्रर जो देहीं विदेहीपणें ॥ दीनोद्धारक नित्य तृप्त ह्रदयीं सपन्न दैवी गुणें ॥
शोभे हा निजरंग निर्गुण निराकारीं सुखासंग्रहीं ॥ या० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP