मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५११ ते ५१५

पदसंग्रह - पदे ५११ ते ५१५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५११. [चाल-कवण तुम्ही कवणाचे]
पंढरपूरच्या बापा तापा लाविं रे कडे ॥ तुजविण दुस्तर हा भवसागर तरणें केविं घडे ॥ध्रु०॥
बहुत देखिले बहुत ऐकिले संसारीं नावाडे ॥ ज्यांच्या संगें हें नाव तैसें होउनि प्राणि बुडे ॥१॥
पावविले त्वां पार उदंड वेडे आणि बागडे ॥ श्रम तूं माझे वारीं तुझे गाईन मी पवाडे ॥२॥
सहज पूर्ण निजरंग अभंग श्रीविठ्ठल जरी जोडे ॥ श्रम कां वाहूं मग कां वाहु व ही आणि बापुडें ॥३॥

पद ५१२. [चा. सदर.]
निधान असतां हातीं आम्ही दैन्य कां भाकूं ॥ ब्रह्म परात्पर इंदिरावर नयनीं अवलोकूं ॥ध्रु०॥
निजभक्तांचा लक्ष्मीकांत अनंत निजांगें पक्षी ॥ सबाह्मांतरसाक्षी नाना संकटीं संरक्षी ॥१॥
भक्तकामकल्पद्रुम शरणागत प्रतिपाळक गांठी ॥ भयकृत्‌ भयनाशक तो असतां पाठिसि जगजेठी ॥२॥
निजानंदघन ब्रह्म सनातन अज अव्यय अविनाशी ॥ सहज पूर्ण निजरंग रंगला श्रीहरि गोकुळवासी ॥३॥

पद ५१३.
वासरमणि कुळभूषण वारिजनयना श्रीरामा ॥ जनकजापति पतितपावना मुनिजनमनविश्रामा ॥ध्रु०॥
दशशत वदनें वदतां दशशत नयनें लक्षूं जातां ॥ तन्न तन्न तुज म्हणती शतपथ अगणित गुण गातां ॥१॥
दशरथनंदन दशमुखमर्दन दशेंद्रियां चाळक तूं ॥ भवभयहरणा अनन्य शरणागत प्रतिपाळक तूं ॥२॥
अवाप्तकामा निजसुखधामा सांब सदाशिव ध्येया ॥ पूर्ण रंग नि:संग निरामय नारदादि मुनि गेया ॥३॥

पद ५१४.
तो नारायण नरदेहीं ॥ संशय न दिसें कांहीं  ॥ध्रु०॥
वेदविहित सत्कर्माचरणें वर्णाश्रमविधि पाळी ॥ नि:स्पृह निरहंकृतिनें शोभे हरि-गुरु-भजन समेळीं ॥१॥
देहादिक भुवनत्रय अवघा विषय वमनवत्‌ लक्षी. ॥ पंक मराळ न भक्षी तैसा काम्य निषेध उपेक्षी ॥२॥
निज रगें रंगला तेव्हां संग भंगला त्याचा ॥ ब्रह्मपरायण तो नारायण निश्वय हाचि त्रिवाचा ॥३॥

पद ५१५.
स्मरता गुरुचे पाय याची गणना मजला काय ॥ दुस्तरतर भवसागर परि मज भासे मृगजळन्याय ॥ध्रु०॥
बाळा बागुल साचचि वाटे प्रबुद्ध लटिकें भावी ॥ मायामय हा प्रपंच इतरांप्रति भवभय हें लावी ॥१॥
रोधुनि लोचन ऐंद्रियजाळीं विविध प्रदार्थ प्रकाशीं ॥ साच गमे परि सज्ञानासी नाहीं प्रतिती ऐसी ॥२॥
स्वप्नीं सत्य गमे जगडंबर जागृतिसी तें नाहीं ॥ द्दश्य पदार्थ लटिका तैसा निज रंगें पाहातांही ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP