पदसंग्रह - पदे ६ ते १०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ६.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ऐसें बोलों या वदनीं ॥ निजनंदें रंगुनि विचरों सच्चित्सुखसदनीं ॥धृ०॥
विश्रांतीचें स्थान मान तें जाणति स्वानुभवी ॥ विज्ञानाचें निज बिज हें श्रुति संकेतें दावी ॥
विगलित वृत्ती होति तयातें स्मरतां सद्भावीं ॥ वपरित भावनेतें निरसुनि देतो निज पदवी ॥१॥
ठसा पडिला याचा करितां नाम हें पाठ ॥ ठकवित बहु भाविकां उमलों नेदीतां ओंठ ॥
ठसकेनें बहु राहतो याची पंढरी पेठ ॥ ठकार ठाणें माणें पाहा तो हा कंबुकंठ ॥२॥
लहरी तरंग आम्ही हा चित्सागर सखोल ॥ लव पळ निमिष्य याविण आह्मांसी कैंची वो वोल ॥
लवण विरालें जळीं याचें कवण करिल मोल ॥ लक्षुनि समपद रंगूं सांडुनि इतर बोल फोल ॥३॥
पद ७.
ॐ मनोजी शांता सद्नुरु जयराम स्वामी ॥ व्याप्य व्यापक तूंचि अवघा सर्वांतर्यामीं ॥धृ०॥
जयराय हें नाम निगमागमिचें निजबीज ॥ जपतां अनुदिन वाचे सिद्धि पावे निजकाज ॥
जड जीव चिद्धन केले स्मरणं एसा माहाराज ॥ जन्ममरण निरसुनियां शोभसि तूं सहजीं सहज ॥१॥
येका नामें पतीत पावन झाले सुनिश्वय ॥ यशस्वी करुणाकपरात्परतर गुरुराय ॥
येउनि मानव लोका प्रबोधिलें जगत्रया ॥ यमलोर कींची राहाटि मोडिली दावुनि निजसोय ॥२॥
राहुनियां वटग्रामीं तूं या निज निर्विकारा ॥ राजस तामस सात्विक नाशुनि त्रिविध अह्कारा ॥
रामनामस्मरणें जन उद्धरिले परात्परा ॥ राग द्वेष हरुनिया दिधलें निजसुख दातारा ॥३॥
मनुष्यरूपें परब्रह्म तूं निर्गुण निष्काम ॥ मनबुद्धयादिक करणें केवळ सच्चित्सुखधाम ॥
मंगळदायक पूर्ण रंग तूं मुनिमनविश्राम ॥ महाराज गुरुवर तूं कृष्णदास जयराम ॥४॥
पद ८
रामदास चतुरक्षरि मंत्र जप वारंवार ॥ दुस्तरतर भवसागरतारक सच्चित्सुख सार ॥धृ०॥
रामदास द्वय अभिन्न नामें गोडी शर्करा ॥ राहाटे परिमळ भुवनीं हातीं घेतां कर्पूरा ॥
राजति वर्तुळशा त्यापरि तें जीवन कीं गारा ॥ राजाविराज अवतरला हा या ज्गदोद्धार ॥१॥
मनुष्यरूपें विलसे परि हा परिपूर्ण काम ॥ मकराकृति कुंडलें पाहातां स्वत:सिद्ध हेम ॥
मंडण संतसमेचें साधक जनासि विश्राम ॥ मस्तकमणि हा शतकोटींचें निजबीज श्रीराम ॥२॥
दस तो उदास सेवुनि परमामृत कंदा ॥ दाता स्वात्मसुखाचा निरसुनि करणाचा धंदा ॥
दानवकुळ षड्वैरी मर्दुनि तारित मतिमंदा ॥ दारा द्रव्य त्यजुनियां सत्वर सद्भावें वंदा ॥३॥
सद्नुरुराज विराजत करुनी सज्जन गिरीवास ॥ सर्वस्वेंशीं शरण रिघावें धरुनियां कास ॥
सत्य सनातन श्रीगुरु समर्थ मुनिमानसहंस ॥ सहज पूर्ण निजरंग रंगला तारक विश्वास ॥४॥
पद ९.
येकनाथ हें नाम पूर्णकाम वद वाचें ॥ श्रवणें स्मरणें दुर्घट तुटतिल पाश भवाचे ॥धृ०॥
यमुना पुलिन विहारी हरि निजभक्तांची माय ॥ येउनि प्रतिष्ठाना स्वयें सेवक तो होय ॥
येरयेरां अभिन्नपण तें जाणति विद्वद्वर्य ॥ येकात्मता बोलिंत बोलीली नवजाय ॥१॥
करण समुच्चय भगवद्भजनें झाला सुश्लोक ॥ करुनियां निजबोधं आत्मानात्मविवेक ॥
कर्म तेंचि ब्रह्मवर्म हें निजनिष्टंक ॥ कल्पनातित होउनि पाहे अनेकीं एका ॥१॥
नामरुपातित अवलोकित या जनीं जनार्दना ॥ नासुनिया उभयतां विपरित असभावना ॥
नादबिंदू कला ज्योती विरहित सनातना ॥ नारायण नररूपें जो या सेवित विज्ञाना ॥३॥
थरकत पति तोद्धार कराया हा याचा पंथ ॥ थडक साहावी प्रथम तरिच हा प्रसन्न गुरुनाथ ॥
थडिये पावविले करुनी भागवत ग्रंथ ॥ थकित केलें निजरंगें या मनिचे मनोरथ ॥४॥
पद १०.
दत्तात्रय दत्तात्रय ऐसें वदतां हे रसना ॥ पावन होइल सहसा प्राप्त नोव्हे दुर्ब्यसना ॥धृ०॥
दशेंद्रियातीत सद्नुरु निजानंदकंद ॥ दयाळ साधक जना अवतरला हा स्वच्छंद ॥
दंभादिक दोषांचा बोधें करुनी उच्छेद ॥ दत्तात्रय हें नाम विराजित नित्य निर्द्वंद्व ॥१॥
तारक भवसागरीं हे खूण बाणली चित्ता ॥ तार्किक ज्ञानें पाहातां याची सर्वही सत्ता ॥
तापत्रय दुरिकर्ता रिपु संहर्ता सुखदाता ॥ ताडित अंधतमासि मुखावरि देशिक चित्सविता ॥२॥
त्नय भेदातित ब्रह्मसदोदित चतुरक्षरी मंत्र ॥ त्रयारक्षक अनाथबंधु शाश्वत स्वतंत्र ॥
त्रयोदश भुवनीं हा व्याप्य व्यापक चिन्मात्र ॥ त्रय देवात्मक मूर्ति होउनी घडली एकत्र ॥३॥
येकीं अनेक अनेकीं एक हा द्दढ निश्वय ॥ येणें जाणें नाहीं तो हा जगद्नुरुराय ॥
येवं अनिर्वचनीय तेथें वर्णूं मी काय ॥ यथोक्त हा निजरंग रंगला हाचि अभिप्राय ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP