मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[मालिनी गण न, न, म, य, य.]

पृथक पृथक आतां क्लेश कोणें करावें ॥ यम नियम बळें हो योग कासे धरावे ॥
विवरुनि सविवेकें दाखवूं तत्वसारा ॥ मृगजळ जग भासे जें कळे तें स्विकारा ॥१॥
शिणवुनि तनु कष्टीं मारुता कां दमावें ॥ फिरत सकळ पृथ्वी विभ्रमें कां रमावें ॥
रज तम अविचारें आचरा कां अघोरा ॥ मृगजळ० ॥२॥
अविहित न तपावें काम कुमंत्रा जपावें ॥ न कळत अविवीच्या कर्दमीं कां रुपावें ॥
कुटिल कुजनसंगा दुष्टभागा निवारा ॥ मृगजळ० ॥३॥
निगमवचन कानीं सद्नरू सौख्यदानीं ॥ वदत निजश्रुतीचें तत्त्व साधा निदानीं ॥
तदुपरि विवराहो त्या सुखें निर्विकारा ॥ मृगजळ० ॥४॥
निजसुखजलवीचा मातला रंग रंगीं ॥ निरवधि अणु र्कैची हो निजनंद-संगीं ॥
विषय उगवयाच्या कोण जाणेल पारा ॥ मृगजळ जग भासे० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP