मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[वसंततिलका, गण त, भ, ज, ज, ग.]

स्वप्नीं यतीसि धन पुत्र कलत्र बंधू ॥ साम्राज्य भोग सकळै विषयीं समंधू ॥
तें जागृतीं विफल होउनि जाय जैसें ॥ झाल्या प्रबोध मग भासत विश्व तैसें ॥१॥
पृथ्वी हुताश जळ मारुत मेघ मेरु ॥ धेनू मृगें नकुळ सर्प खगें खगेंद्रू ॥
चित्रीं विचित्न परि कल्पित भिंति लेशें ॥ झाल्या० ॥२॥
किंवा विशाळ अति दर्पणिचा उभारा ॥ सामावलें गगनमंडळ चंद्र तारा ॥
त्या सोज्वळावरि विलास अनेक भासे ॥ झाल्या० ॥३॥
वाद्यें तुरंग रथ कुंजर वीर सेना ॥ ग्रामें गृहें विविध वृक्ष पदार्थ नाना ॥
गंधर्वपूर विलसे परि व्यर्थ जैसें ॥ झाल्या० ॥४॥
वोडंबरीं नसत तेंचि करूनि दावी ॥ सज्ञान सावध असावधतेसि गोंवी ॥
नि:संग रंग सहजें वसिजे आकाशें ॥ झाल्या प्रबोध मग० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP