मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[इंद्रवज्रावृत्त.]

वंध्यासुतें शुक्तिक रोप्यपात्रीं ॥ मृगांबुचे मीन भरोनि रात्नीं ॥
दातृत्वगंधर्वपतीस केलें ॥ हें सर्वही पर्व तसें उदेलें ॥१॥
सेवूनियां हो घृत कांसवीचें ॥ परामवी तेज दिवीं रवीचें ॥
खपुष्प सप्तस्वर गायनाचे ॥ हे सर्वही पर्व तसेंचि साचे ॥२॥
लेवूनियां रज्जु भुजगमाळा ॥ खेळे कळे बागुल इंद्रजाला ॥
छाया नुठे चित्र हुताश तेजें ॥ हें सर्वही पर्व तसें विराजें ॥३॥
भीष्मात्मजेसी वर वायुपुट्र ॥ क्लैबात्मजें जाणुनि ब्रह्मसूत्न ॥
लग्नासि नेलें धन दर्पणींचें ॥ हें सर्वही पर्व तसेंचि साचे ॥४॥
ते आमुची सोगई हो म्हणोनी ॥ आले अजन्में परिसोनि कानीं ॥
मारूं अले घेउनि अश्वशृंगा ॥ आकाशिंच्या लावुनि नीळरंगा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP