मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[मालिनीवृत्त.]

सकलहि वश झाल्या या कला आणि विद्या ॥ परम चतुर झाला शीकला गद्यवद्या ॥
सदय ह्रदय नाहीं कोण मी हें कळेना ॥ तरि मग वितुकंही ज्ञात तें कां जळेना ॥१॥
अपर धनद झाला पाहतां या भुलोकों ॥ धन कनक ललामें ते न भोगी न शेखी ॥
द्विज विबुधन मित्रां दान यज्ञीं मिळेना ॥ तरि मग तितुकेंही द्रव्य तें कां जळेना ॥२॥
द्वितिय सुरगुरू-जो शब्द-ज्ञानार्थ बोधी ॥ द्दढ पर उपदेशी सर्वही ग्रथ शोधी ॥
रत अविहितकर्मीं चित्तवृत्ती गळेना ॥ तरि मग तितुकेंही बोलणें कां जळेना ॥३॥
अगणित घडलीं हीं सांग विध्युक्त कर्में ॥ शत मख जरि झाले मोहिले ते स-कामें ॥
परि हरिपदप्राप्तीलागिं जें आढळेना ॥ तरि मग तितुकेंही कर्म त कां जळेना ॥४॥
गृह सुत धन दारा देह द्वारां अमूपें ॥ विषयपर सुखें जीं नैश्वरें दु:खरूपें ॥
निजसुख निजरगें जोंवरी आकळेना ॥ तरि मग तितुकेंही साख्य तें कां जळेना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP