पदसंग्रह - पंचक
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[इंद्रवज्रा. गण त, त, ज, ग, ग.]
कल्पांत तों देह चिरायु झाले ॥ मानी जसे वस्तिसि आजि आले ॥
बोधं सदां निश्चळ वर्ततांही ॥ वर्तोनि देहीं परि तो विदेही ॥१॥
जाया पशू पुत्र वसोनि गेहीं ॥ वर्तोनि० ॥२॥
आलें विभागासि तयासि पाळी ॥ विनाशकाळीं न मरी कपाळीं ॥
जाळी क्रिया ज्ञान-हुताश दाहीं ॥ वर्तो० ॥३॥
देहाकडे प्राचिन भोग लावी ॥ ब्रह्मांड-भांडोदर द्दश्य भावी ॥
खेळे जसें वारिजपत्र डोहीं ॥ वर्तोनि० ॥४॥
लोकीं दिसे वर्तत देहकामीं ॥ निरंकुशा त्याप्रति कोण नेमी ॥
तो रंग नि:संग न बोलतांही ॥ वर्तोनि० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP