पदसंग्रह - पदे ६५१ ते ६५५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ६५१.
घरा नका जाऊं त्याचें तोंड नका पाहूं ॥ भेटी झाल्या सचैल स्नानावीण नका राहूं ॥ध्रु०॥
वेदबाह्म क्रियानष्ट परपीडक आंगें ॥ निर्दय निष्ठुर काळ क्रमी असत्सगें ॥१॥
भक्ति ज्ञान विरक्तिचा लेश नसे कांहीं संशय सर्वदांही ॥ मी कोण हें समजेना ह्मणत अहं देही ॥२॥
निजानंदीं चित्त न रंगे ज्याचें तोंड पाहूं नका त्याचें ॥ सिद्धांत वर्णायासि भय काय त्याच्या बाचें ॥३॥
पद ६५२.
संसारीं काय सार असे गुरुतें पुसें ॥ध्रु०॥
धन सुत दार परिग्रह वैभव हे नव्हती सुखकारक रे ॥ जनन मरण अघहरण चरण ते सेवीं भवनिधितारक रे ॥१॥
सारासार विबोधुनि तुजला करितिल संशयविरहित रे ॥ ब्रह्म परात्परमी विश्वंभर प्रत्यय येइल निश्वित रे ॥२॥
तेव्हां तूं निजसौख्यविनोदें स्वच्छंदें क्रीडसि नाना रे ॥ पूर्ण रंग संसार हरिरुप होईल सद्दढ भावना रे ॥३॥
पद ६५३. [चाल-राम राम राम गा.]
या देहाचें पडण काय मिरविसील रे ॥ नाद्याचा बैल तसें फिरविसील रे ॥ध्रु०॥
अस्थि नाडी मेद मांसें भरलें मळमूत्रें रसे ॥ काळाचे हातिंचें कैसें उरविसील रे ॥१॥
विषयांचें धरुनि ध्यान घालुनि स्वहितासि रवाज ॥ हातींचें निधान तूं हरविसील रे ॥२॥
जन्म मरण गर्भवास सोसवेना आला त्रास ॥ पुरे माझी पाठि किती पुरविसील रे ॥३॥
अहंतेनें करूनि उभे काम क्रोध लोभें ॥ कर्में किती शुभाशुभें करविसील रे ॥४॥
निजानंदें पूर्ण रंगें न रंगोनि देह संगें ॥ लक्ष चौर्यायशीं सोंगें धरविसील रे ॥५॥
पद ६५४.
पीतांबरधारी कोण गे हा ॥ध्रु०॥
कोटी कंदर्पगाभा सांवळी अंगप्रभा ॥ देहुडा पाउलीं कां उभा ॥१॥
ब्रह्मादिक सुरवर नेणति याचा पार ॥ वेद शास्त्रां अगोचर ॥२॥
सहज पूर्ण अभंग निजानंदें रंग ॥ सर्व संगा नि:संग ॥३॥
पद ६५५.
तब मै सद्नुरुनाथ कहूं ॥ध्रु०॥
कामादिक षड्वैरी मर्दुनी ॥ साधनीं मन हें लावूं ॥१॥
सारासार विचार विलोकुनी ॥ द्दश्य पदार्थहि त्यागूं ॥२॥
तंतुपटीं मृद्धटवत् अवघें ॥ विश्वीं चिन्मय पाहूं ॥३॥
सहज पूर्ण निजरंगीं रंगुनी ॥ जलतरंगवत् राहूं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP