मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३९१ ते ३९५

पदसंग्रह - पदे ३९१ ते ३९५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३९१. [कवण तुम्ही कवणचे या चा.]
निजहिता मी चोर तुजबरि कां रामा रुसावें ॥ निजमंदिरीं अग्नि लावुनि उदकावरि कोपावें ॥धृ०॥
बहुत बडबड केली परि हें मन ठायीं बैसेना ॥ बहुत वरि बरि माळा परि हे कामक्रोध आवरेना ॥
बहुत जायुष्य गेलें परी साधन कांहीं घडेना ॥ बहुत वरि वरि वेष दाउनि मैंद मोडी माना ॥१॥
माझें हित मी न करी झालों आपला आपण वैरी ॥ तुजवरि काय बोल आळशी मीच सर्वांपरी ॥
निजानंद सुख सोडुनि विषय चिंती मन भिकारी ॥ अपराधी मी राम आतां उचित तें तूं करी रे ॥२॥

पद ३९२.
तें रे तें रे तें रे ॥धृ०॥
तुम्हां सांगतों मी एक बेक ॥ ज्याचे स्वरूपिं नाहीं अनेक ॥
तें आपुलेंचि आपण एक ॥ ऐसे म्हणतेही जेथ नाहीं देख ॥१॥
एकमेकापासुनि सकळिक ॥ झाले म्हणती ते परम मूर्ख ॥
नाहीं पट तंतुसी ठाउक ॥ जेथें जाणतें नेणतें भोंक रे ॥२॥
एकबेकासि लाविति खोडी ॥ तेथुनि माया जाहली म्हणती वेडी ॥
कापसाचि नाति पासोडी ॥ तैसें झालें जग जाणे तोचि गडी रे ॥३॥
एकबेक तो सागर एक ॥ ज्याच्या लहर्‍या तरंग लेकी लेक ॥
तैसें जाणा हें जग सकळिक ॥ तेथिल जन्म मरण मिथ्या देख रे ॥४॥
एक बेक तो निजानंद ॥ जेथें नाहीं सुखदु:खबाध ॥
तेथें रंगुनियां अभेद ॥ एकबेकचि झाला शुद्ध रे ॥५॥

पद ३९३. (अभंग)
आमुचे वंशीं कैंचा राम एके पिढियेचें काम ॥१॥
राम रंगीं हो रंगला अवघा निजानंद झाला ॥२॥
बापें जोडिलें निज धन ॥ चवघां वांटिलें समान ॥३॥
एक बंधु रूसला ॥ आपला वांटा घेउनि गेला ॥४॥
संर्ती वांटा केला समान ॥ ज्येष्ठा ठायीं आह्मां भजन ॥५॥
उरलें त्याचें त्यासि पाहीं ॥ अर्थाअर्थीं संबंध नाहीं ॥६॥
आपुल्या बळें करुं जोडी ॥ संतसंगें लावूं वाढी ॥७॥
तिघे निजानंदें धाले ॥ रंग टाकुनि एक झाले ॥८॥

पद ३९४. [चाल-अक्रुर हा नेतो श्रीहरी.]
कृष्णाबाई वोबाईवो अक्षय सुखदायी ॥ अभिष्ट पुरवीं वो पुरवीं वो लागेन मी तव पायीं ॥धृ०॥
कृष्णे माते वो माते वो अनघ निजसुखसरिते ॥ तव गुण वदताती वदताती उत्पत्ति स्थिति संहर्ते ॥
तव तीरनिवासी निवासी निजानंद सुखदाते ॥ तव पदिं मी शरण मी शरण अंतिं स्थळ दे माते ॥१॥
कुकुमति संगमीं संगमीं पुण्यरूप चिद्बूमी ॥ सकळ देवंशी देवेंशीं निजानंद तव धामीं ॥
मार्कंड तीर्थं वो तीर्थं वो अति उत्तम निष्कामी ॥ क्षेत्न संन्यास संन्यास तेथें दे मागत मी ॥२॥
दोहीं निज करीं निज करीं लक्ष्मी क्षेत्रीं धरी ॥ करविर करहाटक करहाटक विलसत नामें बरीं ॥
महिमा न बोलवे न बोलवे निगमातें अणुभरी ॥ निजानंद आनंद रंगला तव तीरीं ॥३॥

पद ३९५.
येसि केधवां मानसमोहना माधवा ॥ भक्तवत्सला दयासिंधु बांधवा ॥धृ०॥
करितांहि रक्षण न राहे मानस क्षण ॥ करुनि काय तें श्रवण ॥
न स्मरे मनन निजध्यास धरी कवण ॥ साक्षात्कारीं आली हारी हे संपूर्ण ॥१॥
मन हें कीर्तनीं दक्ष हाव भाव कटाक्ष ॥ लावुनि धन मानीं लक्ष ॥
भेटतां साधु पावन होतका मुमुक्ष ॥ छळण-वादीं जैसा यक्षचि प्रत्यक्ष ॥२॥
न येसि जरी तूं देवा कायसा माझा केवा ॥ हारी आली तुझि या नांवा ॥
पतीतपावन घोष राहिला आघवा ॥ निजानंदीं मानस रंगवीं राघवा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP