मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ९१ ते ९५

पदसंग्रह - पदे ९१ ते ९५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ९१.
हरि तुझें पतीतपावन नाम ॥धृ०॥
गणिका व्याध अजामिळ वाल्मिक ॥ पावले निजधाम ॥१॥
वर्तमानीं भूत भावीं तरती ॥ होतनि निज निष्काम ॥२॥
पूर्ण र्ग नि:संग निरामय ॥ तारक तूं निजराम ॥३॥

पद ९२.
भगवद्भक्त भजन करिती ॥
पावोनि दुर्लभ जनक रिती ॥धृ०॥
करुनि स्वधर्मकर्म ॥ कर्मिच ब्रह्म ॥
जाणुनि दुर्भव-भ्रम हरिती ॥१॥
नाम रुपात्मक ॥ विश्वनगीं एक ॥
जनक कनक रघुवर वरिती ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें दिक्षाग्रहणें दीन जन उद्धरती ॥३॥

पद ९३.
झालें धन्य मी आजि सये ॥ या श्रीसद्नुरुराजदयें ॥
सच्चित्सुखघन ब्रह्म सनातन स्वानुभवासिच ये ॥धृ०॥
नि:सशय सरली चिंता ॥ वोसरली ममता ॥
देशिक राजकृपेनें झाली सम साम्यें समता ॥१॥
परमामृतपानीं सबाह्य अंतर विज्ञानीं ॥
नित्य तृप्त होउनियां विचरें स्वसुखें चिद्भुवनीं ॥२॥
सार्थकहि परंतु गुरुपद अनुदिनिं मनीं चिंतूं ॥
सहज पूर्ण निज रंगें रंगला जगत्पटिं चित्तंतु ॥३॥

पद ९४.
हर हर सांब सदाशिव स्मरावा ॥ मिथ्या मानुनियां देह परावा ॥
नित्य नूतन भजनीं भाव धरावा ॥ आतां कृतनिश्चय हाचि करावा ॥धृ०॥
सारासार हें विचारुनि मनीं ॥ शिवस्मरणीं हें चित्त नेमुनी ॥
परमपदीं आरूढ जाहले मुनी ॥ चंचळ वृत्ति शम दमें दमुनि ॥१॥
भक्तवत्सल भवसिंधु तारितो ॥ पंचवदन मदन-सदन जाळितो ॥
कामक्रोधादि अरि विदारितो ॥ भोळा शंकर अनिष्ट वारितो ॥२॥
संशय अविश्वास समुळिं त्यजावा ॥ सर्व भावें महादेव भजावा ॥
नवविध भक्तिनें नित्य भजावा ॥ पूर्ण रंगें पुजिलाचि पुजावा ॥३॥

पद ९५.
करिसी कां चिंता करिसी कां चिंता ॥ विसरुनि ह्रदयीं अनंता ॥धृ०॥
विश्वकुटुंबी राम ॥ असतां स्वत: सिद्ध विश्राम ॥१॥
स्थिरचर सुर संरक्षी ॥ राम सर्वस्वें कै पक्षी ॥२॥
निजानंद रंग संगें ॥ रामीं आराम होईं आंगें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP