मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १७६ ते १८०

पदसंग्रह - पदे १७६ ते १८०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १७६.
हरिनाम-सुधारस पान करीं ॥धृ०॥
अमरां न चुकति पुनरावृत्ति ॥ स्मरणें तूं निजमुक्ति वरीं ॥१॥
कीटक भृकुटि भयें तद्रुप झाली ॥ भावें तूं हरि ह्रदयीं धरीं ॥२॥
हरि स्मरतां हरिरूप निजांगें ॥ टाळी वाहुनि रंग भरीं ॥३॥

पद १७७.
दयासिंधु हरि दीनबंधु येई रे ॥धृ०॥
पतितपावना हरि मजवरि करुणा करीं ॥ झडकरि चहुं करीं क्षेम देईं रे ॥१॥
गुरुढारुढ होउं नको हळु हळु चालूं नको ॥ मन पवन त्यजुनिया धांव घेईं रे ॥२॥
स्वच्छंदा निर्द्वद्वा निजानंदकंदा ॥ रंगुनियां पूर्ण पदा नेईं रे ॥३॥

पद १७८.
रुक्मिणीरमण हरी ॥ दुर्जय भवभय समुळ हरी ॥धृ०॥
होउनियां दशविध अवतारी ॥ मर्दुनि दानव सज्जन तारी ॥१॥
त्रिभुवनीं स्थिरचर चालक पाळक ॥ म्हणवित मी नंदाचा बाळक ॥२॥
सच्चित्सुखघन ब्रह्मसनतन ॥ पूर्णरंग मुनि मानसमोहन ॥३॥

पद १७९.
कांहीं  सर्व काळ पर्वकाळ येत नाहीं ॥धृ०॥
पर्वकाळ अर्धोदय पूर्वपुण्यें प्राप्त होय ॥ दुर्लभतर जन्म या मनुजदेहीं ॥१॥
चिद्नंगे करुनि स्रान विधीयुक्त गोदान ॥ ब्रह्मीं ब्रह्मार्पण सहज पाहीं ॥२॥
सहज पूर्ण निजानंदें रंगोनियां स्वच्छंदें ॥ शुद्ध बुद्ध नित्य मुक्त होउनियां राहीं ॥३॥

पद १८०. (चाल-अभंगाची)
सन्मार्गें चालति पाय तरि चुकतिल सर्व अपाय ॥धृ०॥
वृक व्याघ्र वृश्विक सर्प ॥ या असुरांचा महादर्प ॥१॥
मोठे कंटक रुपती वाटे ॥ तेणें क्लेश मनीं बहु वाटे ॥२॥
सत्संगतीं पूर्ण आनंद ॥ आडमार्गें मारक मैंद ॥३॥
शुद्ध सत्व अंत करणें ॥ हरिस्मरणें विहिताचरणें ॥४॥
मूळ सोडूं नये सत्संग ॥ तरी सहज पूर्ण निज रंग ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP