मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भुजंगप्रयात गण य, य, य, य.]

करी एक विज्ञप्ति चित्ता सुपात्ना ॥ वृथा हिंडसी या किती जन्मयात्रा ॥
त्वजीं सर्य चांचल्य निश्वीत राहीं ॥ निजानंदनामें निजानंद पाहीं ॥१॥
तुझे संगतीं मी किती क्लेश साहों ॥ वृथा भोग भोगूनियां नित्य राहों ॥
अरे या जतीं सौंख्य तो आन नाहीं ॥ निजानंद० ॥२॥
बहू इंद्रियें शीगलीं दुष्ट कर्में ॥ घडे ताप तापत्रयाचेनि धर्में ॥
विसावों सुखें इच्छिसी जाण देहीं ॥ निजानद० ॥३॥
बरें मूळ चक्षी अभेदीं निरीक्षी ॥ तुझ्या सर्व कर्मीं असे कोण साक्षी ॥
सुखानंद तूं रे न वाहे प्रवाहीं ॥ निजानंद० ॥४॥
अवस्थात्रयीं जो वसे सूत्रधारीं ॥ जगीं रंग जो शोभला निर्विकारी ॥
नये बोलणें बोलतां मात्र कांहीं ॥ निजानंद० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP