मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५४१ ते ५४५

पदसंग्रह - पदे ५४१ ते ५४५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५४१.
माझें मन रंगलें रामीं ॥ध्रु०॥
जें जे दिसतें तें तें रामचि भासे सबाह्म अंतर्यामीं ॥१॥
गोडी साखर ब्रह्म परात्पर नग कैंचा हेमीं ॥२॥
पूर्ण निजानंदें रंगलें सच्चित्सुखधामीं ॥३॥

पद ५४२.
मतिमंदा रे काय केला धंदा ॥ध्रु०॥
दुर्लभ हे तनु मानवी पावुनि नेणसि आनंदकंदा ॥१॥
मृगजळ शाश्वत मानुनियां मनीं करीसी नानाछंदा ॥२॥
त्यागुनियाम निजरंग सनातन श्रीगुरुचरणरविंदा ॥३॥

पद ५४३.
तो घण मणी ना ॥ कळिकाळासि गणीना ॥ध्रु०॥
चित्तंतू प्रत्ययांवरी नामरूप पटवीना ॥१॥
नित्य तृप्त परमामृतें विषय तृषा उपटीना ॥२॥
सहज पूर्ण निजरंगीं ॥ नानारंग आणीना ॥३॥

पद ५४४.
मोह मदांध पडे याचें कौतुक तो न घडे ॥ध्रु०॥
निजद्दष्टीवरी पडळ आलें मग सहजचि चांचपडे ॥१॥
द्दश्य पदार्थीं स्वरुप लक्षी पदोंपदीं मुरडे ॥२॥
सर्व रंगीं जिजरंग ना पाहे मग रडे वरडे ॥३॥

पद ५४५.
मोहमद्यपी यद्यपि बोलतो ॥ तरी विस्मरणें चालणें चालतो ॥ध्रु०॥
बोलतो बोल तो मोल पावेचिना ॥ निरखुनि पाहतां दिसें फोल तो ॥१॥
बोलण्याविण जो चालणें चाले ॥ दीनबंधु दयासिंधु खोलतो ॥२॥
बोलणें चालणें पारुषलें तो ॥ सहज पूर्णरंगें निजानंदें डोलतो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP